शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखसाठी वानखेडे स्टेडियमचे दार उघडले, एमसीएचा निर्णय

By admin | Updated: August 2, 2015 13:51 IST

सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी वानखेडे स्टेडियमवर प्रवेश करण्यास शाहरुख खानवर घातलेले निर्बंध रविवारी मागे घेण्यात आले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २ -  सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी वानखेडे स्टेडियमवर प्रवेश करण्यास  शाहरुख खानवर घातलेले निर्बंध रविवारी मागे घेण्यात आले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आता शाहरुख खानला वानखेडेवर प्रवेश करता येणार आहे.

२०१२ मध्ये आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळाला होता. या विजयानंतर शाहरुख खानने वानखेडे स्टेडियमवर अक्षरशः धिंगाणा घातला होता. शाहरुखने मैदानात उपस्थित असलेले एमसीएचे पदाधिका-यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. तसेच मैदानातील सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करत त्यांना  शिवीगाळ केली होती. या घटनेनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने शाहरुख खानवर पाच वर्षांची बंदी टाकली होती. यानुसार शाहरुख खानला वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करता येत नव्हते. यामुळे आयपीएलच्या वानखेडेवरील सामन्यांमध्ये शाहरुखला संघासोबत हजेरी लावता येत नव्हती. ही बंदी २०१७ मध्ये संपणार होती. 

शाहरुख खानवरील बंदी मागे घेण्यासंदर्भात रविवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनची बैठक पार पडली.  या बैठकीत शाहरुखवरील बंदी मागे घेण्याचा प्रस्ताव आशिष शेलार यांनी मांडला व अखेरीस हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. आयपीएलमधील संघमालक व देशातील नागरिकावरच स्टेडियममध्ये बंदी घालणे अयोग्य असल्याचे मत आयपीएलच्या समितीनेही मांडले होते.