शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सलामीची लढत रद्द, रहाणे-शिखरची अर्धशतकं पाण्यात

By admin | Updated: June 24, 2017 03:52 IST

भारत वि. वेस्ट इंडिज यांच्यादरम्यानच्या एकदिवसीय मालिकेतील पहिली लढत पावसामुळे रद्द करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतत्रिनिदाद, दि. 24 : भारत वि. वेस्ट इंडिज यांच्यादरम्यानच्या एकदिवसीय मालिकेतील पहिली लढत पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. सतत येणाऱ्या पावसाच्या व्यत्ययानंतर पंचांनी हा निर्णय घेतला. दोन तास पावसानी बॅटींग केल्यानंतर पंचांनी वेस्ट इंडिजला डकवर्थ लुईस नियमांनुसार 29 षटकांत 194 धावांचे आव्हान दिले. पण पुन्हा पावसाची बॅटींग सुरु झाली. त्यानंतर पंचांनी सामना अनिर्णीत घोषित केला. त्यामुळे पाच सामन्याच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना रद्द झाला आहे. 

रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये डावाची सुरुवात केलेल्या अजिंक्य रहाणे याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आश्वासक सुरुवात करताना शानदार अर्धशतक झळकावले. रहाणे -शिखर धवन यांनी १३२ धावांची जबरदस्त सलामी देत भारताला दमदार सुरुवात करून दिली. पावसामुळे दुसऱ्यांदा खेळ थांबला तेव्हा भारताने ३९.२ षटकांत ३ बाद १९९ धावांची मजल मारली. दोन्ही सलामीवीरांना मात्र आपल्या खेळीचे शतकात रूपांतर करण्यात अपयश आले.पोर्ट आॅफ स्पेन येथे यजमानांनी नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकही सामना खेळण्यास न मिळाल्यानंतर रहाणेला रोहितच्या जागी डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करताना रहाणेने शानदार फलंदाजी केली. त्याने धवनसह संघाच्या धावसंख्येला आकार देताना ७८ चेंडंूत ८ चौकारांसह ६२ धावा काढल्या. रहाणे मोठी धावसंख्या उभारणार असे दिसत असतानाच, खराब फटका मारुन तो बाद झाला. अल्झारी जोसेफने टाकलेला अप्रतिम हळुवार चेंडूवर रहाणे चकला. आक्रमक फटका मारण्याच्या नादात उंच उडालेला झेल सहजपणे पकडून जेसन होल्डरने रहाणेला तंबूचा रस्ता दाखवला.दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम फलंदाज ठरलेल्या धवनने आपला फॉर्म कायम राखताना विंडीज गोलंदाजांची पिटाई केली. रहाणे बाद झाल्यानंतर त्याने कोणतेही दडपण न घेता कर्णधार कोहलीसह भारताच्या धावांची गती कमी होऊ दिली नाही. त्याने ९२ चेंडूत ८ चौकार व २ षट्कारांसह ८७ धावांची खेळी केली. अवघ्या १३ धावांनी त्याचे शतक हुकले. देवेंद्रो बिशूच्या अप्रतिम चेंडूवर तो पायचित झाला. युवराज सिंग ४ धावांवर बाद झाल्याने भारताचा डाव घसरला. यानंतर कोहलीने (३२*) संयमी फलंदाजी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर प्रशिक्षकाविना विंडीज दौऱ्यावर आलेला संघ, कर्णधार कोहली आणि नुकताच प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिलेले अनिल कुंबळे यांच्यातील वादप्रकरण अशा घडामोडीनंतर भारताच्या कामगिरीवर क्रिकेटविश्वाचे लक्ष होते. परंतु, फलंदाजांनी या सर्व गोष्टींचा आपल्या कामगिरीवर कोणताही विपरीत परिणाम होऊ दिला नाही. धावफलकभारत : अजिंक्य रहाणे झे. होल्डर गो. जोसेफ ६२; शिखर धवन पायचित गो. बिशू ८७, विराट कोहली नाबाद ३२, युवराज सिंग झे. लेविस गो. होल्डर ४, महेंद्रसिंग धोनी खेळत आहे ९. अवांतर- ५. एकूण : ३९.२ षटकात ३ बाद १९९ धावा. गोलंदाजी : जेसन होल्डर ८-०-३४-१; अल्झारी जोसेफ ८-०-५३-१; अ‍ॅश्ले नर्स ४-१-२२-०; मिग्युएल कमिन्स ८-०-४६-०; देवेंद्रो बिशू १०-०-३९-१, कार्टर १.२-0-५-0.