शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘फायनल’साठी एक विजय : कोहली

By admin | Updated: May 22, 2015 00:52 IST

राजस्थान रॉयल्सला ७१ धावांनी पराभूत केल्यानंतर आता एक विजय त्यांना ‘फायनल’मध्ये पोहोचवू शकतो, असे म्हटले आहे.

पुणे : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसंघाचा कर्णधार विराट कोहली याने इंडियन प्रीमियर लीग एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सला ७१ धावांनी पराभूत केल्यानंतर आता एक विजय त्यांना ‘फायनल’मध्ये पोहोचवू शकतो, असे म्हटले आहे.आरसीबीने बुधवारी विजयाबरोबरच दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये स्थान मिळवले. आता त्यांचा सामना २२ मे रोजी रांची येथे चेन्नई सुपरकिंग्ज संघाशी होणार आहे.आरसीबीने एबी डिव्हिलियर्स (६६) आणि मनदीपसिंग (नाबाद ५४) यांच्यातील तिसऱ्या गड्यासाठीच्या ११३ धावांच्या भागीदारीमुळे ४ बाद १८0 अशी धावसंख्या उभारली आणि त्यानंतर हर्षल पटेल (१५ धावांत २ बळी), युजवेंद्र चहल (२0 धावांत २ बळी), श्रीनाथ अरविंद (२0 धावांत २ बळी) व डेव्हिड वाइसी (३२ धावांत २ गडी) यांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर रॉयल्सला १0९ धावांत गारद केले.दुसरीकडे रॉयल्सचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने आज काहीही त्यांच्या बाजूने नसल्याचे म्हटले. स्मिथ म्हणाला, ‘‘या सामन्यात बऱ्याचशा बाबीत आमच्याकडून चुका झाल्या. आम्ही सुरुवात चांगली केली; परंतु दरम्यानच्या षटकांत आम्ही लय कायम ठेवू शकलो नाही. डिव्हिलियर्स आणि मनदीप यांनी सुरेख फलंदाजी केली. १६0 हा स्कोर पाठलाग करण्यासारखा होता; परंतु त्यांनी त्यापेक्षा जास्त धावा केल्या. स्पर्धेच्या अंतिम सत्रात आम्ही चांगल्या लयीत नव्हतो, असे मला वाटते.’’ (वृत्तसंस्था)सामन्यानंतर कोहली म्हणाला, ‘‘आता कोणताही उपांत्यपूर्व फेरीचा सामना राहिला नाही. पुढील लढत उपांत्य फेरीसारखी आहे. २0१३ मध्ये आम्ही पात्र ठरलो नव्हतो त्याची खंत वाटत होती. आम्ही गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा चांगले खेळलो. आता एक विजय आम्हाला फायनलमध्ये पोहोचवू शकतो. एक कर्णधार म्हणून मी खूप खूष आहे.’’आजच्या सामन्याविषयी कोहली म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे म्हटले, तर सात षटकांनंतर मलाही आम्ही प्रथम गोलंदाजी करायला हवी होती, असे वाटले होते; परंतु इॅबी जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे हे आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. मनदीपनेही शानदार खेळी केली.’’