शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

ब्राझीलमध्ये भारतीय दूतावासाला दिले एक कोटी रुपये : क्रीडामंत्री

By admin | Updated: August 5, 2016 20:50 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या गरजांबाबत सुरू असलेल्या चर्चा व अन्य मुद्यांची दखल घेताना ब्राझीलमधील भारतीय दूतावासाला एक कोटी रुपये

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ५ : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या गरजांबाबत सुरू असलेल्या चर्चा व अन्य मुद्यांची दखल घेताना ब्राझीलमधील भारतीय दूतावासाला एक कोटी रुपये पाठविण्यात आल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी स्पष्ट केले. या निधीतून भारतीय पथकाला आवश्यक असलेल्या बाबींची तरतूद करता येईल.क्रीडा मंत्री गोयल यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, भारताचे आतापर्यंतचे सर्वांत मोठे पथक या स्पर्धेत सहभागी होत आहे. आमचे १०१ खेळाडू यापूर्वीच क्रीडाग्राममध्ये दाखल झाले असून उर्वरित खेळाडू नियोजित वेळी रिओत दाखल होतील.

आॅलिम्पिक इतिहासात प्रथम भारत सरकार आणि भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) यांच्या विनंतीचा स्वीकार करीत आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) क्रीडाग्राममध्ये भारतीय भोजन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली.यामुळे भारतीय खेळाडूंना घरी असल्यासारखे वाटेल आणि चांगली कामगिरी करतायेईल.

गोयल यांनी अलीकडेच घडलेल्या काही घटनांचा उल्लेख करताना सांगितले की,ह्यहॉकी संघाने टीव्ही व अतिरिक्त फर्निचरबाबत (खुर्ची व टेबल) म्हटले होते. अशा बाबी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रिओ आॅलिम्पिक आयोजनसमितीची आहे. त्यांनी खुर्च्यांच्या स्थानी बीन बॅग उपलब्ध करून दिले. आम्ही ब्राझीलमध्ये असलेल्या दूतावासाकडे एक कोटी रुपये पाठविले असून त्यात भारतीय पथकाला आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी करता येईल.

काही हॉकीपटूंच्या जर्सीच्या आकाराच्या मुद्यावर बोलताना गोयल म्हणाले, हे प्रकरण आयओए आणि हॉकी इंडिया यांनी सोडवले आहे. टेनिसपटू लिएंडर पेस व रोहण बोपन्ना यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट करीत क्रीडा मंत्री म्हणाले, या दोघांमध्ये चांगला ताळमेळ आहे. टेनिसचा ड्रॉ कठीण आहे, पण आमचा खेळाडूंवर विश्वास आहे.उद््घाटन समारंभात काही महिला खेळाडू साडीवर ब्लेझर घालणार नसल्याचे वृत्ताबाबत बोलताना क्रीडा मंत्री म्हणाले,ह्यआयओएला उद््घाटन समारंभासाठी आयओसीच्या नियमाचे पालन करावे लागेल.

गोयल पुढे म्हणाले,ह्यमाझे अधिकारी खेळाडूंच्या अडचणी समजून घेण्यासाठी रिओ आणि दिल्लीमध्ये कुठल्याही क्षणी उपलब्ध राहतील. ब्राझीलमध्ये भारतीय दूतावासाकडून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. काही अडचणी आमचे अधिकारी आयओए, फेडरेशन आणि रिओ आॅलिम्पिक आयोजन समितीसोबत मिळून सोडवित आहेत. सरकारने प्रथमच सर्वसामान्य नागरिकांना आॅलिम्पिकसोबत जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भविष्यात युवा पिढी आॅलिम्पिक खेळाकडे आकर्षित होण्यास मदत मिळेल.