शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षे विश्वचषकात खेळाडूंना एकदाच संधी : बीसीसीआय ठाम

By admin | Updated: June 30, 2016 20:16 IST

ज्युनियर विश्वचषकांत(१९ वर्षांखालील) खेळाडूंना केवळ एकदा संधी देण्याचा निर्णय बीसीसीआय कार्यकारिणीने नुकताच घेतला.

नवी दिल्ली : ज्युनियर विश्वचषकांत(१९ वर्षांखालील) खेळाडूंना केवळ एकदा संधी देण्याचा निर्णय बीसीसीआय कार्यकारिणीने नुकताच घेतला. यामुळे खेळाडूंच्या वयाची अफरातफर थांबेल असा विश्वास १९ वर्षे गटाच्या भारतीयसंघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केला. वयाची अट पाळण्याबाबत काटेकोर असलेला द्रविड म्हणाला,ह्य१९ वर्षांखालीलविश्वचषकात एकदाच खेळण्याची परवानगी असल्याने वय लपविणाऱ्या खेळाडूंना वचक बसेल. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास १९ वर्षे क्रिकेट हे निकालासाठी नव्हे तर संधीसाठी असते. येथे निकालाऐवजी अनुभवावर भर असावा. नव्या नियमांमुळे दूरगामी परिणाम येतील. बीसीसीआयच्या नव्या नियमांमुळे भावी पिढीतील क्रिकेटपटूंवर सकारात्मक परिणाम होतील. वय लपविणे ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. बीसीसीआयने जी पावले उचलली त्याचे चांगले निकाल येतील.

१९ वर्षे गटात दोनदा खेळण्याचा विचार वाईट नाही. पण यामुळे इतरांना संधी मिळत नाही. खेळाडू १६ वर्षे गटात खेळताना कधी अस्थी चाचणी(बोन टेस्ट) करीत नाही. तो पुढे अनेक वर्षे १९ वर्षे गटातही खेळत राहतो. बीसीसीआयच्या निर्णयामुळे अशा खेळाडूंच्या गैरप्रकारांना खीळ बसणार आहे. १६ वर्षांत चांगला खेळाडू म्हणून पुढे येणारा खेळाडू पुढील दोन वर्षे १९ वर्षे गटातखेळणे वाईट नाही. पण १७ वर्षांच्या वयात खेळाकडे येणारे खेळाडू वारंवार १९ वर्षे गटात खेळत असतील तर अन्य खेळाडूंवर अन्याय होऊ शकतो, असे द्रविडने नमूद केले.

दोनदा विश्वचषकात सहभागी झालेले खेळाडू

रवींद्र जडेजा २००६ आणि २००८, विजय झोल २००२ आणि २००४, संदीप शर्मा २०१०आणि २०१२, सर्फराज खान २०१४ आणि २०१६, रिकी भूई २०१४ आणि २०१६, आवेश खान२०१४ आणि २०१६.