शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पियन महिला हॉकी संघाला रेल्वेत करावा लागला खडतर प्रवास

By admin | Updated: August 29, 2016 20:34 IST

देशात यशाचे शिखर गाठणाºया खेळाडूंना डोक्यावर घेतले जाते, तर दुसरीकडे अपयशी ठरल्यास त्यांना कोणीही विचारत नाही. तशीच काही अवस्था आॅलिम्पियन भारतीय महिला

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 29 -  देशात यशाचे शिखर गाठणाºया खेळाडूंना डोक्यावर घेतले जाते, तर दुसरीकडे अपयशी ठरल्यास त्यांना कोणीही विचारत नाही. तशीच काही अवस्था आॅलिम्पियन भारतीय महिला हॉकीपटूंची रेल्वे प्रवासादरम्यान झाली. त्यांना चक्क फरशीवर बसून रेल्वे प्रवास करावा लागला. अशा प्रकारच्या अनुभवाचा सामना ३६ वर्षांनंतर आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणाºया महिला हॉकी संघातील काही खेळाडूंना नुकताच आला. रिओ आॅलिम्पिकमधील अपयशानंतर त्यांना  घरी परतताना रेल्वेच्या फरशीवर बसून प्रवास करावा लागला. प्राप्त वृत्तानुसार रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाºया महिला हॉकीपटू नमिता टोप्पो, दीप ग्रेस इक्का, लिलिमा मिंज आणि सुनील लाकडा घरी परतताना रांचीच्या राऊरकेला येथे जात असताना धनबाद-एल्लेपे एक्स्प्रेसने प्रवास करीत होत्या. त्यांना बसण्यासाठी एकही सीट मिळू शकलेनाही. त्यांनी टीटीला आग्रह केल्यानंतरही ट्रेनच्या फरशीवरच बसून त्यांना प्रवास करणे भाग पडले.सुनीताने सांगितले, ‘‘आम्ही तिकीट तपासणाºयास आपली ओळखदेखील सांगितली आणि त्यांना अनेक दिवसांच्या प्रवासामुळे थकलो आहोत व एखाद-दोन सीट बसण्यासाठी आम्हाला उपलब्ध करून द्या असा आग्रह त्यांच्याकडे धरला; परंतु टीसीने चक्क असमर्थता दर्शवली आणि आम्हाला फरशीवर बसण्यास भाग पडले. तथापि, काही प्रवाशांनी आम्हाला बसण्यासाठी जागा दिली. देशाचे प्रतिनिधित्व करणाºया खेळाडूंसोबत असे उपेक्षापूर्णा वर्तन केले जाते याचे आम्हाला दु:ख वाटले.’’ त्यानंतर याची दखल रेल्वे अधिकाºयांनी घेत स्पष्टीकरण दिले. खेळाडूंना प्रथम पेनट्री कारमध्ये जागा देण्यात आली आणि त्यानंतर त्यांना थर्ड एसी सीट उपलब्ध करून देण्यात आले होते. तथापि, खेळाडूंनी याविषयी वेगळीच माहिती दिली आहे, असे अधिकाºयाने सांगितले.