शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण अफ्रिकेच्या जंगलातून आॅलिम्पिकच्या मैदानावर : अ‍ॅना लाइॅँग

By admin | Updated: August 11, 2016 08:27 IST

खेळातील महत्वाचे क्षण टिपताना खेळाडूंच्या भावमुद्राही टिपून वेगळेपण सिध्द करणारी एक ५७ वर्षीय महिला आॅलिम्पिकच्या मैदानावरचं नाट्य टिपत आहे

 दक्षिण अफ्रिकेच्या जंगलातून आॅलिम्पिकच्य मैदानावर : ५७ वर्षीय अ‍ॅना लाइॅँग
 
शिवाजी गोरे 
रिओ दि जानेरो, दि. ११ -  दक्षिण अफ्रिकेच्या जंगलात आवड म्हणून सुरू झालेल्या फोटोग्राफीला खेळांची आवड निर्माण झाली. खेळातील महत्वाचे क्षण टिपताना खेळाडूंच्या भावमुद्राही टिपून वेगळेपण सिध्द करणारी एक ५७ वर्षीय महिला आॅलिम्पिकच्या मैदानावरचं नाट्य टिपत आहे.  सोमवारी पहाटेपासूनच पाऊस सुरू होता.  जीतु रायची  महत्वाची स्पर्धा पाहण्यासाठी बसने जात होती. यावेळी कॅमे-याची मोठी ब्रिफकेस, स्टॅँड असा सर्व लवाजमा असलेली एक महिला दिसली. तील थोडी बॅग उचलण्यासाठी मदत करून बसायला जागा दिल्यानंतर बोलायला सुरूवात झाली अन् दक्षिण अफ्रिकेच्या अ‍ॅना लाइॅँग यांचा सगळा प्रवास उलगडत गेला. ५७ व्या वर्षीही तरुणांना लाजेल अशा उत्साहात मैदानावर वावरण्यामागची जिद्द त्यांनी सांगितली. 
अ‍ॅना  म्हणाल्या, ‘‘ दक्षिण आफ्रिकातील पिचेरीया गावात मी रहात हाते. आमच्या गावात शहरातील एका शाळेची सहल आली होती. त्या मुलांकडे मी कॅमरा पाहिला आणि मला मोठे कुतुहल वाटले, याच्या सहाय्याने फोटो काढले जातात. त्यामुळे मला सुध्दा लहान पाणापासून फोटोग्राफीचा छंद होता. जसजशी मोठी होते गेले तसतसे माझी आवड वाढत गेली. साधा कॅमरा घेऊन  जंगलात फोटो काढायला जावू लागले. शिक्षणासाठी  भावाकडे येऊन केपटाऊनमध्ये  विधी शाखेत प्रवेश घेऊन अभ्यास सुरु केला. यावेळी उदारनिर्वाहासाठी केप टाईम्स वृत्तपत्र विकत होते. त्यातील फोटो दररोज पाहायचे आणि आपणही फोटोग्राफी करावी असे वाट लागले. यासाठी एक कॅमेरा घेतला आणि  क्रिकेट, रग्बी, फुटबॉल मैदानावर भटकू लागले.  एके दिवशी केप टाईम्सचा फोटोग्राफर आजारी पडला. मी सरळ मैदानावर जाऊन फोटो काढले आणि सरळ आॅफीसला जाऊन दिले. संपादकांनी ते पाहिले आणि थक्कच झाले. येथूनच माझ्या फोटोग्राफीच्या कारकिर्दीला सुरूवात झाली. ’’
 १९८३ मध्ये अ‍ॅना केपटाईम्सच्या  चिफ फोटोग्राफर आणि १९९६ मध्ये फिचर एडीटर झाल्या. पण स्पोर्टस फोटोग्राफीच्या पॅशनमुळे त्यांना एकाच ठिकाणी  बांधून राहणे आवडले नाही. फ्री लान्सर म्हणून त्यांनी केवळ स्पोर्टस फोटोग्राफीवर लक्ष केंद्रीत केले आहे. ऑलिम्किपपासून विविध स्पर्धा त्या कव्हर करतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘एन्जॉयींग लाईफ’..