शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

निर्मला शेरॉनला आॅलिम्पिक पात्रता

By admin | Updated: July 2, 2016 05:52 IST

भारतीय धावपटू निर्मला शेरॉनने ४00 मीटर धावण्याच्या शर्यतीत आॅलिम्पिक पात्रता मिळवली आहे.

हैदराबाद : भारतीय धावपटू निर्मला शेरॉनने ४00 मीटर धावण्याच्या शर्यतीत आॅलिम्पिक पात्रता मिळवली आहे. येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये तिने आज, शुक्रवारी ५१.४८ सेकंदाची वेळ नोंदवून तिने हे उदिष्ट साध्य केले. याच स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.जीएमसी बालयोगी स्टेडीयमवर सुरु असलेल्या स्पर्धेत निर्मलाने आपली यापूर्वीची ५२.३५ सेकंदाची आणि एम. आर पुवम्मा हिने नोंदवलेली ५१.७३ सेकंदाची वेळ मागे टाकत आॅलिम्पिक तिकीट मिळवले. हरियानाच्या निर्मलाने शर्यतीत सुरवातीपासून शेवटपर्यंत निर्णायक आघाडी मिळवली होती. रियो आॅलिम्पिकच्या पात्रतेसाठी ५२.२0 सेकंदाहून कमी वेळ नोंदवणे आवश्यक होते. निर्मला रियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भारताची २४ वी अ‍ॅथलिट ठरली.पी. टी उषाची शिष्या असलेल्या जिस्ना मॅथ्यूने ५३.१४ सेकंदासह रौप्यपदक तर तामिळनाडूच्या पी, एन. सौदर्या हिने ५३.८५ सेकंदाची वेळ नोंदवून कांस्यपदक पटकाले.महिलांच्या ४ बाय ४00 मीटर रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या महिलांनी सुवर्णपदक जिंकले. ऋचा पाटील, श्रध्दा घुले, भाग्यश्री शिर्के आणि अक्षया अय्यर यांच्या संघाने ही कामगिरी केली. त्यांनी ४७.२६ सेकंदाची वेळ नोंदवून हे सुवर्णपदक आपल्या नावावर केले.