शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिक विजेत्याचा धुव्वा उडवत श्रीकांतचा ऑस्ट्रेलियन ओपनवर कब्जा

By admin | Updated: June 25, 2017 13:11 IST

ऑस्ट्रेलियान ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत श्रीकांतने चीनच्या चेन लॉंगचा 22-20, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला

 ऑनलाइन लोकमत

मेलबर्न, दि. 25 - गेल्याच आठवड्यात इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या किदम्बी श्रीकांतने ऑस्ट्रेलियातही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. आज झालेल्या ऑस्ट्रेलियान ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत श्रीकांतने चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन लॉंगचा 22-20, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला.  

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील श्रीकांतचे हे चौथे सुपरसीरिज विजेतेपद आहे. याआधी त्याने 2014 साली चीन ओपन, 2015 साली इंडिया ओपन, 2017 साली इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद त्याने पटकावले होते. त्याबरोबरच श्रीकांत हा सर्वाधिक सुपरसीरिज विजेतेपदे पटकावणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे. 

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या  श्रीकांतने आज झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीतही जबरदस्त खेळ केला. समोर चीनचा ऑलिम्पिकविजेता खेळाडू चेन लाँग असूनही श्रीकांतच्या खेळावर त्याचा परिणाम दिसून आला नाही. त्याने सुरुवातीपासूनच लढतीवर वर्चस्व राखले. मात्र चेन लॉँगनेही त्याला कडवी टक्कर दिली. अटीतटीच्या पहिल्या गेममध्ये श्रीकांतने 22-20 अशी बाजी मारली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही श्रीकांतने 21-16 असा विजय मिळवत विजेतेपदावर कब्जा केला.