नवी दिल्ली : इंडियन प्रिमीयर लीगच्या यंदाच्या आठव्या सत्रातील १९ ते २४ मेदरम्यान होणाऱ्या प्ले आॅफ फेरीच्या सामन्यांसाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार १९ मे रोजी मुंबईत होणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी रंजन मदुगले (सामनाधिकारी), कुमार धर्मसेना आणि रिचर्ड इलिंगवर्थ (मैदानी पंच), विनीत कुलकर्णी (तिसरे पंच) आणि ओ. नंदन (चौथे पंच) यांची निवड करण्यात आली आहे.३० मे रोजी पुण्यात होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यासाठी रोशन महानामा (सामनाधिकारी), अनिल चौधरी आणि सी. शमसुद्दिन (मैदानी पंच), ख्रिस गफाने (तिसरे पंच) आणि के. श्रीनाथ (चौथे पंच) यांना निवडण्यात आले आहे. तसेच, याच अधिकाऱ्यांवर २२ मे रोजी रांची येथे होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना २४ मे रोजी कोलकाता येथे खेळविण्यात येणार असून, या सामन्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये रंजन मदुगले (सामनाधिकारी), कुमार धर्मसेना आणि रिचर्ड इलिंगवर्थ (मैदानी पंच), विनीत कुलकर्णी (तिसरे पंच) आणि ओ. नंदन (चौथे पंच) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
प्ले आॅफसाठी अधिकाऱ्यांची घोषणा
By admin | Updated: May 7, 2015 03:37 IST