शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

आश्विन कसोटीत नंबन-१ ‘आॅलराउंडर’

By admin | Updated: August 12, 2014 01:32 IST

भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा कोसटी क्रिकेटमध्ये नंबर-१ ‘आॅलराऊंडर’ बनला आहे. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे चौथ्या कसोटीत फलंदाजीत देखणी कामगिरी केल्यामुळे त्याला हे स्थान मिळाले.

दुबई : भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा कोसटी क्रिकेटमध्ये नंबर-१ ‘आॅलराऊंडर’ बनला आहे. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे चौथ्या कसोटीत फलंदाजीत देखणी कामगिरी केल्यामुळे त्याला हे स्थान मिळाले. अश्विनने ओल्ड ट्रॅफर्ड येथे पहिल्या डावात ४० आणि दुसऱ्या डावात नाबाद ४६ धावा ठोकल्या. पण भारताने ही कसोटी एक डाव ५४ धावांनी गमावली. इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने १४ षटके गोलंदाजी केली पण एकही गडी बाद करता आला नव्हता. अश्विनचे ३७२ रेटिंग गुण झाले असून, त्याने द. आफ्रिकेचा खेळाडू व्हर्नोन फिलँडरला मागे टाकले. बांगलादेशचा साकिब अल हसन तिसऱ्या, इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड चौथ्या आणि आॅस्ट्रेलियाचा मिशेल जॉन्सन पाचव्या स्थानावर आहे.दरम्यान, लंकेचा फलंदाज कुमार संगकारा याने पाकविरुद्ध पहिल्या कसोटीत गाले येथे दहावे दुहेरी कसोटी शतक ठोकून कसोटी क्रमवारीत दुसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले. भारताचा चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांना मात्र फटका बसला. सन २०१२ चा आयसीसीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू तसेच यंदाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिलेल्या संगकाराने २२१ आणि २१ धावा ठोकल्याने त्याला ३१ गुण मिळाले. त्याने द. आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स याला पहिल्या स्थानावरून मागे खेचले.डिव्हिलियर्स २०१३ मध्ये आपलाच सहकारी हशिम अमला याला मागे सारून ३३ कसोटीतील २८७ दिवस अव्वल स्थानावर विराजमान होता. अखेरची मालिका खेळत असलेला माहेला जयवर्धने याने ५९ आणि २६ धावा करीत १४ वे स्थान कायम राखले. पुजाराला दोन स्थानाचा फटका बसल्याने तो मात्र १२ व्या तर कोहली २० व्या स्थानावर आहे. गोलंदाजीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अ‍ॅण्डरसन पाचव्या, ब्रॉड नवव्या, अश्विन १३ व्या, प्रज्ञान ओझा १५ व्या आणि ईशांत शर्मा २०व्या स्थानावर आहेत. (वृत्तसंस्था)