शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सार्क बुद्धिबळ स्पर्धेत नुबैरशाह शेखला सुवर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 14:50 IST

आठ देशांच्या ८८ बुद्धिबळपटूचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत नुबैरशाहला तिसरे मानांकन मिळाले होते.

ठाणे : ठाण्याचा आंतरराष्ट्रीय मास्टर नुबैरशाह शेखने आपले वर्चस्व राखताना बांगलादेशाची राजधानी ढाका येथे रंगलेल्या पहिल्या सार्क आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या यशाबद्दल नुबैरशाहला सुवर्णपदकासह तीन हजार पाचशे अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

आठ देशांच्या ८८ बुद्धिबळपटूचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत नुबैरशाहला तिसरे मानांकन मिळाले होते. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नुबैरशाहसमोर सातव्या फेरीत पाकिस्तानचा अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टरमहेमूद लोधीचे आव्हान होते. सामन्यात पांढऱ्या मोहऱ्यानिशी खेळणाऱ्या लोधीने आक्रमक सुरुवात केली होती. त्याला नुबैरशाहने स्लॉव्ह बचावाने उत्तर देत लोधीला विचार करण्यास भाग पाडले. त्यांनतर लोधीने फियानचेट्टी व्हेरिएशन पद्धतीने खेळ करत सामन्यात वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. पण लोधीचा हा प्रयत्न हाणून पडताना नुबैरशाहने घोड्याची चाल खेळत सामन्यात रोमांचकारी स्थिती निर्माण केली.  त्यात  नुबैरशाहने एकापेक्षा एक सरस चाली रचत बचावात्मक खेळ  करणाऱ्या लोधीला  सामना मध्यावर सोडण्यास भाग पाडले. या विजयामुळे सात गुणांसह स्पर्धेतील विजेतेपदाकडे घेऊन जाणारी निर्णायक एक गुणांची आघाडी नुबैरशाहने मिळवली. 

या आघाडीनंतर शेवटच्या नवव्या फेरीत नुबैरशाहचा सामना बांगलादेशचा ग्रँडमास्टर आणि स्पर्धेतील अव्वल मानांकित झिया उर रहमानशी झाला. या सामन्यात नुबैरशाहला  काळ्या मोहऱ्यांनिशी डावाची सुरुवात करावी लागली.त्यात त्याने सिसिलियन बचाव पद्धत अवलंबवत रहमानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. नुबैरशाहने त्यानंतर अँड्रफ व्हेरिएशन आणि थ्रेफॉल व्हेरिएशन  स्थिती तयार करत विजेतेपदावर आपल्या नावाची मोहर उमटवण्यासाठी आवश्यक  असलेला गुण निश्चित करत सामना बरोबरीत राखला. आपल्या खात्यात १८ वे आंतरराष्ट्रीय पदक जमा केले.

टॅग्स :thaneठाणे