शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष्य टोकियो आॅलिम्पिक

By admin | Updated: November 14, 2016 01:45 IST

रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवित सर्वांचे लक्ष वेधणारा रोव्हिंगपटू नाशिकच्या दत्तू भोकनाळचे आता २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचे स्वप्न आहे.

नागपूर : रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवित सर्वांचे लक्ष वेधणारा रोव्हिंगपटू नाशिकच्या दत्तू भोकनाळचे आता २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचे स्वप्न आहे. स्वप्न साकार करण्यासाठी आतापासून तयारीला सुरुवात केली असल्याचे दत्तूने रविवारी सांगितले. गरीब कुटुंबात जन्मलेल्या दत्तू आज विश्व मधुमेह दिवसानिमित्त डॉ. सुनील गुप्ता मधुमेह केअर फाऊंडेशनतर्फे आयोजित चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी नागपुरात उपस्थित होता. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.दक्षिण कोरियात आयोजित एफआयएसए आशियन व ओसानिया आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या सिंगल स्कल इव्हेंटमध्ये रौप्यपदक पटकावित आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या दत्तूने रिओ आॅलिम्पिकचे अनुभव कथन केले. तो म्हणाला,‘ रिओ आॅलिम्पिकसाठी मी केवळ सहा महिन्यांपूर्वी तयारीला प्रारंभ केला होता. एक-दोन वर्षांपूर्वीपासून जर तयारीला प्रारंभ केला असता, तर निकाल नक्कीच वेगळा असता. पण, टोकियो आॅलिम्पिकसाठी आतापासूनच तयारीला प्रारंभ केला असून तेथे देशासाठी पदक पटकावण्यात नक्कीच यशस्वी ठरेल, असा विश्वास आहे.’दत्तूने केंद्र सरकारतर्फे पुरविल्या जाणाऱ्या सुविधांवर समाधान व्यक्त केले. दत्तू म्हणाला,‘आॅलिम्पिकच्या तयारीसाठी सरकारने मला ३० लाख रुपये दिले होते. त्याचप्रमाणे अमेरिकेतील मियामी येथे प्रशिक्षणासाठी पाठविले होते, पण मला स्पर्धेची तयारी करण्यासाठी केवळ सहा महिन्यांचा कालवधी मिळाला.’महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील हा खेळाडू २०१२ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी सेनादलात नोकरीला लागला. २५ जवानांपैकी माझ्यासह केवळ दोघांची रोव्हिंगसाठी निवड झाली.त्याने या खेळात मोठी झेप घेतली. सध्या तो जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी आहे. दोन वर्षांच्या कालावधीत क्रमवारीत १०३ व्या स्थानावर १३ व्या स्थानावर झेप घेणारा तो भारताचा एकमेव रोव्हिंगपटू आहे. रोव्हिंगमध्ये पदकाच्या आशा पल्लवीत करण्यासाठी सरकाने ग्रामीण भागातील खेळाडूंवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला दत्तूने यावेळी दिला. यावेळी पत्रकार परिषदेला डॉ. सुनील गुप्ता, डॉ. कविता गुप्ता, डॉ. अजय अंबाडे आणि प्रवीण ठाकरे आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)