शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

आता टार्गेट टी-२० वर्ल्डकपचे!

By admin | Updated: December 10, 2015 00:38 IST

गोव्याची पहिली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू शिखा पांडे हिला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे.

सचिन कोरडे, पणजीगोव्याची पहिली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू शिखा पांडे हिला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे. हेच तिचे ‘ड्रीम’ आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिखाने आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. पणजी जिमखाना मैदानावर सराव झाल्यानंतर घामाघूम शिखाने ‘लोकमत’शी संवाद साधला. या वेळी तिने आपला इरादा स्पष्ट केला. ती म्हणाली, कोणत्याही क्रिकेटपटूसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणे हे स्वप्नवत असते. विश्वचषक स्पर्धा माझ्यासाठी एक स्वप्न आहे. या स्पर्धेत दुसऱ्यांदा संधी मिळावी, यासाठी मी वाट्टेल ते प्रयत्न करीन आणि मला तसा आत्मविश्वासही आहे. असे झाल्यास दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक खेळणारी शिखा पहिली गोमंतकीय ठरेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या टी-२० स्पर्धेला येत्या २ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी गोव्याचा संघ कसून सरावाला लागलाय. पणजी जिमखान्यावर हा संघ तयारी करीत आहे. त्यानंतर येत्या २६ जानेवारीपासून भारताचा संघ आॅस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. यामध्ये संघ तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवेन, असाही विश्वास शिखाला आहे. आतापर्यंत मिळालेल्या संधीचे आपण सोने केले असून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात बजावलेली भूमिका लक्षवेधी आहे, असेही ती म्हणाली. अविस्मरणीय खेळी...गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकाविलेले अर्धशतक आणि याच सामन्यात मिळवलेले तीन बळी ही कामगिरी अविस्मरणीय अशी आहे, असे शिखाने सांगितले. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-१ ने पिछाडीवर होता. या सामन्यात शिखाने ५६ चेंडूंत ५९ धावांची खेळी केली.