शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

रोहितसाठी आता नवी रणनीती

By admin | Updated: October 13, 2015 23:58 IST

या मालिकेत क्रिकेटच्या क्वॉलिटीबाबत कुणाच्या मनात शंका नसेलच. आतापर्यंत जागतिक दर्जाचा खेळ झालेला आहे. निकाल आमच्यासाठी अनुकूल ठरले असले

या मालिकेत क्रिकेटच्या क्वॉलिटीबाबत कुणाच्या मनात शंका नसेलच. आतापर्यंत जागतिक दर्जाचा खेळ झालेला आहे. निकाल आमच्यासाठी अनुकूल ठरले असले, तरी मालिकेत चूक करण्यास वाव नाही, हे स्पष्ट झाले आहे.कानपूर वन-डे शानदार होती. उभय संघांनी लौकिकाला साजेशी कामगिरी केली. टीम इंडियाने चांगली गोलंदाजी व शानदार क्षेत्ररक्षण केले; पण आमच्या फलंदाजांनी मनोधैर्य ढासळू दिले नाही. दडपणाखालीही आमची कामगिरी उल्लेखनीय ठरली. ३०० धावांचा पल्ला ओलांडणे, शानदार कामगिरी म्हणता येईल. भारतीय संघासाठी ही धावसंख्या पुरेशी ठरेल, असे आम्हाला वाटले होते; पण रोहितने आणखी एकदा शानदार खेळी केली. तो चांगल्या फॉर्मात आहे. सुरुवातीला टी-२० आणि आता वन-डेमध्येही त्याची प्रचिती आली. आम्ही त्याला रोखण्यासाठी पुन्हा एकदा नवी योजना आखत आहोत. रोहित भरात असताना सामना भारताकडे झुकत असल्याचे दिसत होते.यजमान संघाने मोठे लक्ष्यही सोपे ठरविले होते; पण आम्ही हार न मानता या लढतीत स्वत:ला कायम राखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इम्रान ताहीरने सामना आमच्या बाजूने झुकवला. त्याने डावाच्या ४७व्या षटकात २ विकेट घेतल्या. डेथ ओव्हर्समध्ये स्टेन व रबाडा यांनी दडपणाखाली शानदार मारा केला. एक छोटी चूकही आम्हाला महाग ठरली असती. अखेर विजय मिळविण्यात आम्ही यशस्वी ठरलो. महेंद्रसिंह धोनीला यानंतर टीकेलाही सामोरे जावे लागले; पण माझ्या मते हा त्याच्यावर अन्याय आहे.या लढतीत चुका करण्यास वाव नसतो आणि निकाल भारताच्या विरोधात गेला असला, तरी माझ्या मते धोनी एक महान खेळाडू, महान कर्णधार आणि महान व्यक्ती आहे. प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू असलो, तरी त्याच्याबाबत आमच्या मनात आदर आहे.ही लढत मोर्ने मोर्केलसाठी विशेष आनंद देऊन गेली. त्याच्यासाठी हा १००वा सामना होता. विश्व क्रिकेटमध्ये तो दिग्गज वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो; पण आमच्या संघात त्याची ओळख संघासाठी सर्वस्व पणाला लावणारा खेळाडू अशी आहे. इंदूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या लढतीतही आम्ही कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहोत. आणखी एक विजय मिळविला, तर मालिकेत २-० ने आघाडी घेता येईल आणि भारतावर त्यामुळे निश्चितच दडपण आणखी वाढेल. कशाचीच हमी देता येत नसली, तरी आगामी दिवसांमध्ये जगातील दोन अव्वल संघांदरम्यान ‘टॉप क्लास’ क्रिकेट बघायला मिळेल, हे नक्कीच सांगता येईल. (टीसीएम)