शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष्य ‘११ साल बाद’चे!

By admin | Updated: September 2, 2015 23:50 IST

श्रीलंकन भूमीवर २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचा चमत्कार भारतीय संघाने केला. आता याच संघापुढे आव्हान असेल ते विजयाचे. दक्षिण आफ्रिकन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

नवी दिल्ली : श्रीलंकन भूमीवर २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचा चमत्कार भारतीय संघाने केला. आता याच संघापुढे आव्हान असेल ते विजयाचे. दक्षिण आफ्रिकन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तेव्हा त्यांच्याविरुद्ध ११ वर्षांनंतर मालिका जिंकण्याचे आव्हान भारतापुढे असेल. दक्षिण आफ्रिकेचा संघ या दौऱ्यात तीन टी-२०, पाच एकदिवसीय आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सुरुवातीला एकदिवसीय सामने आणि त्यांनतर कसोटी मालिका खेळविण्यात येईल. कसोटीस पाच नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. दरम्यान, आता विराट कोहलीचा संघ जेव्हा पुन्हा एकदा कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरेल तेव्हा त्यांना घरच्या परिस्थितींचा फायदा उठवत आफ्रिकेला ११ वर्षांनंतर पराभूत करण्याची चांगली संधी असेल. असा आहे इतिहास..भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ११ कसोटी सामन्यांच्या मालिका खेळल्या गेल्या. त्यात दक्षिण आफ्रिका संघाने सहा, तर भारताने दोन मालिका जिंकल्या आहेत. इतर तीन मालिका बरोबरीवर संपुष्टात आल्या. भारताने या दोन्ही कसोटी मालिका घरच्या भूमीवर जिंकल्या आहेत. मात्र, यातील अखेरची मालिका त्यांनी २००४ मध्ये जिंकली होती. त्यानंतर मात्र भारताला मालिका जिंकता आली नाही. सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघाने २००४ मध्ये दुसरा कसोटी सामना कोलकाता येथे जिंकला होता. ही मालिका जिंकत त्यांनी १-० ने विजय मिळवला होता. त्यानंतर उभय संघांत पाच मालिका खेळल्या गेल्या. त्यात आफ्रिकेने दोन व इतर तीन मालिका बरोबरीवर सुटल्या होत्या. भारताने २००४ आधी, १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या भूमीवर तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पराभूत केले होते.