शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयच्या बैठकीत सहभागी झाल्याने श्रीनिवासन, शहा यांना नोटीस

By admin | Updated: July 14, 2017 18:00 IST

बीसीसीआयच्या विशेष आमसभेत सहभाग घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने एन. श्रीनिवासन आणि निरंजन शहा यांना नोटीस बजावली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १४ - बीसीसीआयच्या विशेष आमसभेत सहभाग घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने एन. श्रीनिवासन आणि निरंजन शहा यांना नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासक समितीने सादर केलेल्या अहवालात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यावर पारदर्शकतेत  खोडा घातल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून श्रीनिवासन आणि निरंजन शहा यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. 
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार श्रीनिवासन हे कुठल्याही राज्य क्रिकेट संघटनेचे सदस्य होण्यास पात्र नाहीत. मात्र तरीही त्यांनी तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधी म्हणून बीसीसीआयच्या विशेष आमसभेत सहभाग घेतला, असा आरोप क्रिकेट प्रशासक समितीने केला आहे. श्रीनिवासन हे २६ जून रोजी झालेल्या बीसीसीआयच्या विशेष आमसभेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी लोढा समितीच्या शिफारशींना विरोध करण्याचा प्रयत्न केला होता.
अधिक वाचा
(पुन्हा ‘समिती’चा खेळ )(बीसीसीआयची विशेष आमसभा आज )(अनुराग ठाकूर यांचा सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफीनामा )
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष असलेल्या श्रीनिवासन यांनी विशेष आमसभेचा एक तृतियांश वेळ वाया घालवला. तसेच क्रिकेट प्रशासक समितीनच्या पारदर्शकता रिझोल्युशनला अन्य सदस्यांनी विरोध करावा यासाठी फितवण्याचे कामही श्रीनिवासन यांनी केले, त्यांनी निरंजन शहा यांना सोबत घेऊन बैठकीत आराजक माजवण्याच्या प्रयत्न केला. असेही क्रिकेट प्रशासक समितीने अहवालात पुढे म्हटले आहे. 
दरम्यान या प्रकारावर सुनावणी करताना जी व्यक्ती राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवण्यास अयोग्य ठरवण्यात आली. तीच व्यक्ती तामिळनाडू क्रिकेट संघटनेची प्रमुख कशी काय होऊ शकते, अशी विचारणा करत सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.  आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय २४ जुलै रोजी निर्णय घेणार आहे. मात्र श्रीनिवासन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी क्रिकेट प्रशासक समितीचे आरोप फेटाळले आहेत. "क्रिकेट प्रशासक समितीला श्रीनिवासन फोबिया झाला आहे. श्रीनिवासन यांच्यावर टीका करणे हेच त्यांचे एकमेव धोरण आहे. तामिळनाडू क्रिकेट संघटनेला त्यांचा प्रमुख निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे." असे  सिब्बल यांनी सांगितले.