गुवाहाटी : स्पेनचा स्ट्रायकर सजिर्यो कोंट्रेर्स पादरे ऊर्फ कोके याने पहिल्या हाफमध्ये नोंदवलेल्या गोलच्या बळावर नॉर्थ ईस्ट युनायटेडने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या केरळ संघावर पराभवाचा ‘ब्लास्ट’ केला.
मार्सेलच्या कोके याने पहिल्या हाफच्या अखेरच्या क्षणी म्हणजे 45 व्या मिनिटाला हा विजयी गोल नोंदवला. त्याचा हा दमदार शॉट ब्लास्टर्सचा इग्लंडचा माजी गोलरक्षक डेविड जेम्स रोखू शकला नाही. एबोर खोंगजीने डेव्हिडचा थ्रो कोकेच्या दिशेने गेला याचा पूर्ण फायदा उठवत कोकेने त्याचे रुपांतर गोलमध्ये केले. ही आघाडी नॉर्थईस्ट युनायटेडने अखेर्पयत कायम ठेवली. त्याआधी, नॉर्थईस्टला 33 व्या मिनिटालाच आघाडी मिळाली असती मात्र दुर्गा बोरोचा फटका गोलरक्षक जेम्सने अडवला.
स्टेडियमच्या स्टॅण्डमध्ये उभ्या असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत खेळणा:या केरळला संधी मिळाल्या मात्र त्यांना यश् आले नाही. दुस:या हाफमध्ये ब्लास्टरच्या ह्युमोला गोल नोंदवण्याची संधी होती मात्र त्याचा हा फटका एबोबर कॉर्नरकडे पाठवला.
ब्लास्टरच्या मायकल चोपडा याने सर्वाधिक संधी गमावल्या. या स्पर्धेत स्पेनच्या खेळाडूंकडून केला गेलेला हा तिसरा गोल आह़े नॉर्थईस्ट संघाचा पुढील सामना एटलॅटिको डी कोलकाता यांच्या विरुद्ध होईल़
(वृत्तसंस्था)
4नवी दिल्ली : जुवेंट्सचा
महान खेळाडू आणि इटली विश्वकप विजेत्या संघाचा देल पियारो फ्रान्सचा डेव्हिड ट्रेजेगेतचा समावेश असलेल्या पुणो एफसी संघाची
इंडियन फुटबॉल लीग स्पर्धेतील (आयएसएल) पहिली लढत अलेजांद्रो
देल पियोरासारखे खेळाडू असलेल्या दिल्ली डायनामोज संघाविरुद्ध उद्या (मंगळवारी) होणार आहे.
4जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या मैदानावर होणा:या या लढतीत एफसी पुणो संघाला आपला पहिला विजय नोंदविण्यासाठी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे लागणार आहे.
4एफसी पुणो संघाची मदार ओमागबेमी, डेव्हिड
ट्रेङोग्युड, इव्हान पालासिओस जे. अब्राचेंस, लियेन
रॉड्रिक्स या फळीतील खेळाडूंवर असेल.
4दिल्ली संघात इटली,
डेन्मार्क, नेदरलॅँड्स,
स्पेन, पोतरुगाल, ब्राझील, बेल्जियम आणि ङोक प्रजासत्ताकाचे खेळाडू आहेत.