शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

निशिकोरी, हालेप, मुगुररुजा तिसऱ्या फेरीत

By admin | Updated: May 26, 2016 03:50 IST

जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने आपल्या कारकिर्दीतील २२व्या विजेतेपदासाठी दमदार सुरुवात केली. त्याचबरोबर पाचवी मानांकित

पॅरिस : जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने आपल्या कारकिर्दीतील २२व्या विजेतेपदासाठी दमदार सुरुवात केली. त्याचबरोबर पाचवी मानांकित जपानची केई निशिकोरी, स्पेनची गरबाईन मुुगुररुजा व रोमानियाची सिमोना हालेप यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला गटात पाचव्या मानांकित व्हिक्टोरिया अझारेंकाला पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला. भारताचे रोहन बोपन्ना आणि लिएंडर पेस यांनी आपापल्या जोडीदारांसह दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला.अग्रमानांकित सेरेना विल्यम्सने पहिल्या फेरीत स्लोव्हाकियाच्या मगाडेलेना रिबारिकोव्हाला ६-२, ६-२, अशा सलग सेटमध्ये पराभूत करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सेरेनाच्या झंझावातासमोर रिबारिकोव्हाला काहीच करता आले नाही. सेरेनाला दुसऱ्या फेरीत ब्राझीलच्या तेलियाना पेरियराशी दोन हात करावे लागणार आहेत. पेरियराने झेक गणराज्याच्या क्रिस्टिना प्लिस्कोव्हाचा तीन तास चाललेल्या सामन्यात ७-५, ३-६, ९-७ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात पाचवी मानांकित निशिकोरीने रशियाच्या आंद्रेई कुझ्नेत्सोव्हाला ६-३, ६-३, ६-३ अशा सलग सेटमध्ये पराभूत केले. (वृत्तसंस्था)चौथी मानांकित मुगुरुरजाने फ्रान्सची मिरटाईल जॉर्जिसला ६-२, ६-० असे, तर हालेपने कझाकिस्तानच्या जलिना डियासला ७-६, ६-२ असे पराभूत केले. चेक गणराज्याच्या पेत्रा क्वितोव्हाने तैवानच्या सी सू वेईला ६-४, ६-१ असे, तर रशियाच्या स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हाने ब्रिटनच्या हिथर वॉटसनला ६-१, ६-३ असे पराभूत करून तिसऱ्या फेरीतील स्थान पक्के केले.महिला गटात बुधवारी एक मोठा उलटफेर झाला. पाचवी मानांकिंत व्हिक्टोरिया अजारेंकाला पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले. इटलीच्या करीन नैप हिने तिला ६-३, ६-७, ४-० असे पराभूत केले. पहिला सेट गमावल्यानंतर दुसरा सेट जिंकून अजारेंकाने सामन्यात रंग भरला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये ४-० अशा पिछाडीनंतर ती जखमी होऊन बाहेर पडली.बोपन्ना व त्याचा रोमानियाचा साथीदार फ्लोरिन मर्गिया यांनी पहिल्या फेरीत स्टेफनी रॉबर्ट आणि अलेक्सांद्रे सिडोरेंका या फ्रान्सच्या जोडीचा ६-२, ६-२ असा पराभव केला, तर पेस आणि त्याचा पोलंडचा साथीदार मार्सिन मातकोवस्की या १६व्या मानांकित जोडीने बेलारुसचा एलियाकसांद्र बुरी आणि उझबेकिस्तानचा डेनिस इस्तोमिन जोडीचा ७-६, ७-६ असा पराभव केला.पुरुषांच्या गटात स्पेनच्या डेव्हिड फेरर व स्पेनच्या फेलिसियानो लोपेजने पुढील फेरीत प्रवेश केला. लोपेजने इटलीच्या थॉबस फाबियानोला ६-४, ६-४, ३-६, ६-२ असे पराभूत केले. द्वितीय मानांकित ब्रिटनच्या अँडी मरेने ५ सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत फ्रान्सच्या माथियास बोरगेचा ६-२, २-६, ४-६, ६-२, ६-३ असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला.