शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भारतासमोर न्युझीलंडचे १२७ धावांचे माफक आव्हान

By admin | Updated: March 15, 2016 21:09 IST

भारतीय गोलंदाजाच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने न्युझीलंडला २० षटकात धावावर १२६ धावात रोखले. भारताला विजयासाठी निर्धारीत २० षटकात १२७ धावांची गरज आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १५ - भारतीय गोलंदाजाच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने न्युझीलंडला २० षटकात धावावर १२६ धावात रोखले. भारताला विजयासाठी निर्धारीत २० षटकात १२७ धावांची गरज आहे. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा करत न्युझीलंडच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलं. 
 
टी २० विश्वचषकाच्या रणसंग्रामाला आज भारत-न्युझीलंड या सामन्याने सुरवात झाली. न्युझीलंडचा कर्णधार केन विल्यमस्ने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण भारतीय गोलंदाजानी अचुक मारा करत न्युझीलंडच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखले.
 
भारतार्फे पहिल्याच षटकात आर अश्विनने धोकादायक मार्टीन गुप्टीलला पायचीत बाद करत भारताला पहिले यश मिळून दिले. तर दुसऱ्या षटकात अनुभवी नेहराने कॉलीन मुन्रोला हार्दिक पांड्याकरवी झेलबाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. आर अश्विन, नेहराने आणि रैना यांनी प्रत्येकी एका गड्याला बाद केले होते. रैनाने रॉस टेलरला धावबाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. अश्विनने आपल्या ४ षटकात ३२ धावा खर्च करताना एका न्युझीलंडच्या फलंदाजाला बाद केले. तर रैनाने सुरेख गोलंदाजी करताना आपल्या ४ षटकात १६ धावा देताना १ गडी बाद केला. बुमराने आपल्या ४ षटकात गोलंदाजी करताना १५ धावांच्या मोबदल्यात एक गडी बाद केला.
 
न्युझीलंडकडून कोरी अ‍ॅन्डरसन (३४)चा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला धावा जमवणे जमले नाही. त्यांचे फलंदाज ठरावीक अंतरावर बाद होत गेले. कर्णधार केन विल्यमस् (८) कॉलीन मुन्रो (७),मार्टीन गुप्टील (६), रॉस टेलर(१०), मिशेल सेंटनेर (१८), ग्रांट इलियट(९), ल्यूक रोंची (१९), यांनी धावांचे योगदान दिले. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा न्युझीलंडने १४ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात ७८ धावा केल्या होत्या. 
 
सामन्याचे हायलाइट -
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
- अश्विने मार्टीन गुप्टीलला पायचीत बाद करत भारताला पहिले यश मिळून दिले
- कॉलीन मुन्रोला हार्दिक पांड्याकरवी झेलबाद करत नेहराने भारताला दुसरे यश मिळवून दिले
- न्युझीलंडने १० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात ५३ धावा केल्या. न्युझीलंडकडून कोरी अ‍ॅन्डरसन (२६) रॉस टेलर(७) नाबाद      खेळत असून न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत.
-  रैनाचे अप्रतिम क्षेत्ररक्षण, रॉस टेलर धावचित; न्यूझीलंड ४ बाद ६१
- धोकादाक ठरु पाहणाऱ्या कोरी अ‍ॅन्डरसनला ३४ धावाववर बाद करत बुमराहने भारताला ५वे यश मिळवून दिले.
-  न्यूझीलंडला सहावा धक्का. जडेजा ने केला मिशेल सॅन्टनरला आऊट
 - अश्विन, नेहरा, बुमरहा, जडेजा, रैना यांनी प्रत्येकी एका न्युझीलंडच्या फलंदाजाला बाद केले
-   भारतीय गोलंदाजाच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने न्युझीलंडला २० षटकात धावावर १२६ धावात रोखले. भारताला विजयासाठी निर्धारीत २० षटकात १२७ धावांची गरज आहे.