शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

न्यूझीलंडने पाकला पराभूत करून मालिका जिंकली

By admin | Updated: February 4, 2015 01:06 IST

दुसरी एकदिवसीय लढत : केन विल्यम्सन, रॉस टेलरची शतके

दुसरी एकदिवसीय लढत : केन विल्यम्सन, रॉस टेलरची शतके
नेपियर : केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांची आक्रमक शतकी खेळी आणि नंतर टीम साउदी, एडम मिल्ने, नॅथन मॅक्युलम, ग्रॅन्ट एलियोट यांनी घेतलेल्या प्रत्येकी दोन विकेटच्या जोरावर न्यूझीलंड संघाने दुसर्‍या एकदिवसीय लढतीत पाकिस्तानचा ११९ धावांनी दणदणीत पराभव करून विजय नोंदवीत २-० ने मालिका जिंकली. न्यूझीलंड संघाने वेलिंग्टन येथे पहिली लढत ७ विकेटने जिंकली होती.
मॅकलिन पार्कच्या मैदानावर नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाचा कर्णधार मॅक्युलमने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय मार्टिन गुप्तिल (७६), विल्यमसन ( ८८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकाराच्या साहाय्याने ११२) आणि रॉस टेलर (७० चेंडूंत १३ चौकार व २ षटकार) यांनी सार्थक ठरविला. या तिघांच्या धुवाधार फलंदाजीमुळे न्यूझीलंडने ५० षटकांत ५ बाद ३६९ धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्या ग्रॅन्ट एलिओटने २८ धावा केल्या. त्याने २१ चेंडूंत दोन षटकार ठोकले. रॉन्ची शून्यावर बाद झाला तर एनएल मॅक्युलम ९ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून मोहम्मद इरफानने ५२ धावांत दोन गडी बाद केले. त्यांच्या शाहिद आफ्रिदीने, एसान अदिल, अहमद शेहजादने प्रत्येकी एक बळी घेतला.
३७० धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीस मैदानावर उतरलेल्या पाक संघाचा डाव ४३.१ षटकांत सर्वबाद २५० धावांत संपुष्टात आला. पाककडून मोहम्मद हाफिज व अहमद शेहजादने आघाडीला फलंदाजीस येऊन अनुक्रमे ८६ व ५५ धावांची खेळी करून आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली, हाफिजने ८९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार मारले. त्यानंतर फक्त कर्णधार मिसबाह उल हकहाच ४५ धावा करू शकला. नंतर पाकचे पाच फलंदाज दुहेरी धावसंख्या पार करू शकले नाहीत. पाकचे युनूस खान (११), शाहिद आफ्रिदी (११), उमर गुल (४), हारीस सोहेल (६), सर्फराज अहमद (१३), बिलावल भ˜ी (९), एसान अदिल (१) हे लवकर बाद झाले. (वृत्तसंस्था).
===================================================