शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडचा मालिका विजय

By admin | Updated: August 11, 2016 04:47 IST

इश सोढी आणि मार्टिन गुप्टिल या फिरकी गोलंदाजांनी अचूक मारा करताना घेतलेल्या प्रत्येकी ३ बळीच्या जोरावर बलाढ्य न्यूझीलंडने यजमान झिम्बाब्वेचा दुसरा डाव अवघ्या १३२ धावांत उखाडला

बुलावयो : इश सोढी आणि मार्टिन गुप्टिल या फिरकी गोलंदाजांनी अचूक मारा करताना घेतलेल्या प्रत्येकी ३ बळीच्या जोरावर बलाढ्य न्यूझीलंडने यजमान झिम्बाब्वेचा दुसरा डाव अवघ्या १३२ धावांत उखाडला. या शानदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने तब्बल २५४ धावांनी बाजी मारताना दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी निर्विवादपणे जिंकली. क्वीन्स स्पोटर््स क्लब मैदानावर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी ३८७ धावांचे कठिण आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची चौथ्या दिवसअखेर ३ बाद ५८ धावा अशी अवस्था झाली. यावेळी झिम्बाब्वेच्या सर्व आशा पहिल्या डावातील शतकवीर क्रेग एर्विनवर अवलंबून होत्या. मात्र तो केवळ २७ धावाच काढू शकला. गुप्टिलने त्याला बाद करुन न्यूझीलंडच्या मार्गातील मुख्य अडसर दूर केला. तर, सलामीवीर टिनो मवोयो (३५), डोनाल्ड तिरिपानो (२२) आणि चामू चिभाभा (२१) यांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.झिम्बाब्वेचा अर्धा संघ ११२ धावांत गारद करुन न्यूझीलंडने आपली स्थिती मजबूत केली. गुप्टिलने शानदार मारा करताना ११ धावांत ३ बळी घेतले. तर सोढीने १९ धावांत ३ बळी घेत झिम्बाब्वेचे कंबरडे मोडले. टिम साऊदी, टे्रंट बोल्ट, नील वॅगनर व मिशेल सँटर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी, झिम्बाब्वेला ३६२ धावांत गुडाळल्यानंतर न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सन (नाबाद ६८) व रॉस टेलर (नाबाद ६७) यांच्या जोरावर आपला दुसरा डाव ३६ षटकात २ बाद १६६ धावांवर घोषित केला होता. (वृत्तसंस्था)