शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषक जिंकताच खेळाडूंचे ‘नग्न सेलिब्रेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 07:03 IST

न्यूझीलंडच्या रग्बी सेव्हन पुरुष संघाचा प्रताप; फोटो व्हायरल

सॅन फ्रॅन्सिस्को : विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर विजयी संघातील खेळाडूंनी सेलिब्रेशन केल्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा तुम्ही पाहिल्या असतील. क्रिकेट, फुटबॉलमध्ये खेळाडू आणि संघाची सेलिब्रेशनची खास स्टाईल असते. काहीजण शर्ट काढून आनंद व्यक्त करतात, तर काहीजण मैदानात हातवारे करीत चाहत्यांना सुखावून सोडतात. काही खेळाडूंची आनंद व्यक्त करण्याची स्टाईल ट्रेडमार्क स्टाईल बनलेली असते.न्यूझीलंडच्या रग्बी सेव्हन संघातील एका खेळाडूने विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर चक्क नग्न होत सेलिब्रेशन केले. कर्ट बाकर असे या खेळाडूचे नाव असून, त्याच्या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को शहरात रविवारी रग्बी विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. न्यूझीलंडने इंग्लंडचा ३३-१२ असा पराभव केला. यासोबतच न्यूझीलंडने रग्बी विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. विजयानंतर सहकाºयांसोबत ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशनदरम्यान बेफाम झालेल्या कर्टने नग्न होत फोटोसेशन केले. न्यूझीलंडच्या महिला संघानेही विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यामुळे आनंद द्विगुणीत झाला होता.बुधवारी पहाटे आॅकलंड येथे आगमन झाल्यानंतर या संघाचे कोच क्लार्क लेडलॉ यांनी मात्र आपल्या खेळाडूंचे समर्थन करीत विश्वचषक जिंकल्याचा आनंद व्यक्त केल्याचे म्हटले आहे.संघाचा कर्णधार स्कॉट करी याने ड्रेसिंग रूममध्ये बीअर उघडून विजयाचा जल्लोष करताच बाकरने पारंपरिक आवेशात निर्वस्त्र होत या आनंदात भर घातली. विशेष असे की संघाच्या फोटोमध्येही काही खेळाडू निर्वस्त्र बसल्याचे दिसत आहे. बाकरने यावर स्पष्टीकरण देत केवळ गंमत म्हणून मी कपडे काढले. कुणाला त्रास देण्याचा माझा हेतू नव्हता. फोटोसाठी आणि सहकाºयांना आनंद देण्यासाठी मी निर्वस्त्र झालो होतो, असे म्हटले आहे. युवावस्थेपासूनच विजयाचा आनंद मी अशाप्रकारे साजरा करीत असल्याचे बाकरचे मत होते.  

टॅग्स :New Zealandन्यूझीलंडSportsक्रीडा