शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

न्यूझीलंडसाठी ‘मौका भी.., दस्तूर भी..!’

By admin | Updated: February 9, 2015 02:46 IST

दहापैकी तब्बल सहावेळा उपांत्यफेरीत पोहोचूनही विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न प्रत्येकवेळी भंगले, हा न्यूझीलंड क्रिकेटचा इतिहास आहे

विश्वास चरणकर, कोल्हापूरदहापैकी तब्बल सहावेळा उपांत्यफेरीत पोहोचूनही विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न प्रत्येकवेळी भंगले, हा न्यूझीलंड क्रिकेटचा इतिहास आहे. हा इतिहास बदलण्यासाठी ‘ब्लॅक कॅप्स’ यंदा प्रयत्न करणार आहेत. मायदेशात होणारी स्पर्धा आणि संघाची चांगली तयारी यामुळे या संघाला यंदा अभूतपूर्व संधी निर्माण झाली आहे. ही संधी त्यांनी साधली नाही तर त्यांच्यासारखे दुर्दैवी तेच. कसोटी दर्जा प्राप्त झालेला न्यूझीलंड हा पाचवा देश आहे. त्यांनी आपला पहिला वन-डे सामना १९७२-७३मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला. १९७५ च्या विश्वचषकात त्यांनी ग्लेन टर्नरच्या नेतृत्वाखाली सेमीफायनलपर्यंत मजल मारली; पण तेथे त्यांची गाठ वेस्ट इंडीजच्या वादळाशी पडल्यामुळे त्यांना गाशा गुंडाळावा लागला.१९७९च्या दुसऱ्या स्पर्धेतही त्यांनी सेमीफायनल गाठली; पण यावेळी त्यांना यजमान इंग्लंडने पराभूत केले. १९८३च्या विश्वचषकात सरस धावगतीच्या आधारे पाकिस्तान पुढे गेल्यामुळे न्यूझीलंडचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. १९८७च्या विश्वचषकातही ते पहिल्या फेरीतच बाहेर पडले. १९९२चा विश्वचषक आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड या दोन देशांत झाला. मायदेशातील या स्पर्धेत न्यूझीलंडने राउंड रॉबीन फेरीत आठपैकी सात सामने जिंकून गुण तक्त्यात अव्वल स्थान गाठले होते. यातील एकमेव पराभव पाकिस्तानकडून झाला होता. सेमीफायनलमध्ये पुन्हा त्यांची गाठ याच पाकिस्तानशीच पडली. १४ गुण घेऊन आलेला न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलियापेक्षा केवळ एक गुण जास्त म्हणजे नऊ गुण मिळालेला पाकिस्तान यांच्यात झालेली सेमीफायनल पाकिस्तानने जिंकली आणि न्यूझीलंडचे स्वप्न पुन्हा एकदा भंग पावले. यानंतर १९९९, २००७ आणि २०११ या तीन वेळेला सेमीफायनलमध्ये पोहोचूनही त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही, असा हा न्यूझीलंड संघ मायदेशातील स्पर्धेकडे मोठ्या आशेने पाहतो आहे. प्रत्येक विश्वचषकात न्यूझीलंडची गणना ‘डार्कहॉर्स’ म्हणून केली जाते; पण हा विश्वचषक असा आहे की, ज्यामध्ये विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक संघ म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्याला कारणही तसेच आहे. संघाची धुरा आज ब्रँडन मॅक्युलम याच्याकडे आहे. तो सध्या फार्मात आहे आणि विशेष म्हणजे तो ‘कॉन्फिडंट’ आहे. त्याने सूत्रे हातात घेतल्यापासून संघाची वाटचाल सकारात्मक झाली आहे. तो स्वत: एनर्जेटिक असल्यामुळे त्याने संघातही जान आणली आहे. हाच आत्मविश्वास त्यांच्या हातात २0१५चा विश्वचषक देऊ शकतो. मार्टिन गुप्तील, केन विलियम्सन, रॉस टेलर, मिशेल मॅक्लेनघन अशी दमदार फळी न्यूझीलंडची फलंदाजी समृद्ध बनविते.गोलंदाजीत त्यांच्याकडे वर्ल्डक्लास नावे नसली तरी मायदेशातील खेळपट्टीवर टीम साउदी, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम मिलने हे तुफान उधळू शकतात. फिरकी गोलंदाजीत त्यांची मदार डॅनिएल व्हिट्टोरी या जुन्या जाणत्या खेळाडूवरच आहे. न्यूझीलंडसाठी यंदा ‘मौका भी है.. दस्तूर भी है.. !’, अशीच परिस्थिती आहे.