शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मिळणार नवा प्रशिक्षक

By admin | Updated: June 21, 2017 20:48 IST

अनिल कुंबळेने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - अनिल कुंबळेने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या  श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळेल, अशी माहिती बीसीसीआयमधील वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी दिली आहे. कर्णधार विराट कोहलीशी झालेल्या मतभेदांनंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळे याने काल आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
याबाबत माहिती देताना राजीव शुक्ला म्हणाले, " श्रीलंका दौऱ्यापर्यंत अनिल कुंबळेला प्रशिक्षकपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेत राजीनामा दिल्यावर मंडळाने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी संघाला नवा प्रशिक्षक मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. तसेच संघासाठी आम्ही सर्वोत्तम प्रशिक्षकाचा शोध घेऊ." 
प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी बीसीसीआयने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर अनिल कुंबळे याने पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शुक्ला यांनी दिली. 
काल संध्याकाळी अनिल कुंबळेने आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. कुंबळे प्रशिक्षक म्हणून यशस्वी ठरला असता, तरी त्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत चांगले संबंध राखता आले नव्हते. अखेर परिस्थिती चिघळल्यावर त्याने संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला. 
कुंबळेने  पद सोडताना कर्णधार विराट कोहलीच्या वर्तनावर आश्चर्य व्यक्त केले होते. भारतीय संघाच्या कर्णधाराला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप होता. आमच्यामधील भागीदारी अस्थायी होती, असा आरोप  कुंबळेने पायउतार होताना केला. फेसबुक आणि ट्विटरवर एक पोस्ट करत जंबोने आपल्या नाराजीला मोकळी वाट करून दिली होती.