शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

टर्निंग विकेटवर फलंदाजांनी संयम राखण्याची गरज : शास्त्री

By admin | Updated: December 13, 2015 02:30 IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत विजय मिळवल्यानंतरही संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी भारतीय फलंदाजांना ‘टर्निंग विकेट’वर संयम राखण्याची

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत विजय मिळवल्यानंतरही संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी भारतीय फलंदाजांना ‘टर्निंग विकेट’वर संयम राखण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.शास्त्री यांनी बीसीसीआयच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराट कोहलीचे नेतृत्व आणि अजिंक्य रहाणे व शिखर धवन यांच्या फलंदाजीची प्रशंसा केली. शास्त्री म्हणाले, ‘भारतीय संघासाठी अडचण ही आहे, की आमचे खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळत नाही आणि यात त्यांची चूक नाही. भारतीय संघाचा कार्यक्रम व्यस्त आहे. त्यामुळे फूटवर्क आणि टर्निंग खेळपट्ट्यांवर फूटवर्कमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. टर्निंग खेळपट्ट्यांवर उणिवा स्पष्ट होतात.’शास्त्री पुढे म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत भारतीय संघ विदेशात खेळला. ज्यावेळी मायदेशात खेळावे लागले त्यावेळी परिस्थिती बदललेली होती.’शास्त्री यांनी रहाणेची प्रशंसा केली. रहाणेने पहिल्या दोन कसोटी सामन्यांत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या लढतीत शानदार पुनरागमन केले. पहिल्या लढतीत तो बचावात्मक फटका खेळताना तर दुसऱ्यांदा तो आक्रमक फटका खेळताना बाद झाला. दिल्ली कसोटीत मात्र त्याने कामगिरीत सुधारणा केली.’ विराट कोहलीच्या नेतृत्वाची शास्त्री यांनी प्रशंसा करताना म्हटले, की ‘९ डिसेंबर २०१४ रोजी कोहलीने प्रथमच अ‍ॅडिलेडमध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. वर्षभरानंतर तो जिगरबाज संघाचे नेतृत्व करीत आहे, असे वक्तव्य करू शकतो. विराट प्रत्येक ठिकाणी असतो आणि प्रत्येकासोबत संवाद साधतो. कर्णधारामध्ये ही कला असणे आवश्यक असते. (वृत्तसंस्था)