शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

अन्य क्रीडा महासंघांप्रमाणे बीसीसीआयच्या कामात पारदर्शकता असणे आवश्यक : क्रीडामंत्री

By admin | Updated: August 4, 2015 22:53 IST

देशातील अन्य क्रीडा महासंघांप्रमाणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या कार्यात पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने

नवी दिल्ली : देशातील अन्य क्रीडा महासंघांप्रमाणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या कार्यात पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय सार्वजनिक संस्था असल्याचे म्हटले आहे, असे मत क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले. बीसीसीआयला माहितीच्या अधिकार कक्षेत आणायला पाहिजे का, याबाबत सोनोवाल म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय सार्वजनिक संस्था असल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही मी याचा हवाला दिला आहे.’’कोपेनहेगेनमध्ये विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय तिरंदाजांच्या सत्कार समारंभादरम्यान पत्रकारांसोबत बोलताना सोनोवाल म्हणाले, ‘‘देशातील क्रीडाप्रेमींना आशा आहे, की सर्व क्रीडा महासंघांच्या दैनंदिन कार्यामध्ये पारदर्शकता असावी. बीसीसीआय प्रदीर्घ कालावधीपासून खासगी संस्था असल्याचे मत व्यक्त करीत आहे, कारण ते शासनाकडून कुठलाही निधी घेत नाहीत; पण सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय सार्वजनिक संस्था असून त्यांच्या कार्याची समीक्षा करता येईल, असे म्हटले आहे. त्यामुळे बीसीसीआयला आरटीआय अधिनियमाखाली आणण्याचे सरकारला नवे अस्त्र मिळाले आहे.’’दरम्यान, रियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना सरकारतर्फे पूर्ण मदत दिली जाईल, असे आश्वासन यांनी सोनोवाल यांनी दिले. भारतीय तिरंदाज रियो आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावण्यात यशस्वी ठरतील, अशी आशा त्यांनी या वेळी व्यक्त केली. तिरंदाजीमध्ये भारताचे ४ खेळाडू आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. दीपिकाकुमारी, लक्ष्मीराणी माझी व रिमिल बुरुली यांचा समावेश असलेल्या महिला रिकर्व्ह संघाने विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावून कोटा स्थान मिळवले. पुरुष विभागात मंगलसिंग चम्पियाने आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. (वृत्तसंस्था)