शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोलंदाजीत षटकांच्या गतीवर लक्ष देणे गरजेचे

By admin | Updated: June 8, 2017 04:19 IST

पाकिस्तानवरील भारताचा विजय दोन्ही संघांमधील फरक अधोरेखित करतोच

सुनील गावसकर लिहितात...पाकिस्तानवरील भारताचा विजय दोन्ही संघांमधील फरक अधोरेखित करतोच, शिवाय आम्ही जेतेपदाचा बचाव करण्यासाठी चॅम्पियन्समध्ये आलो आहोत, असा अन्य संघांना संदेश देणारा आहे. संघाची ही चौफेर अष्टपैलू कामगिरी ठरली. पाकिस्तानला निश्चिंतपणे नमविण्याची ‘विराट अ‍ॅन्डकंपनी’ची पद्धत फारच सुरेख होती. या देखण्या विजयानंतरही भारताने क्षेत्ररक्षणातील सुधारणेवर भर द्यायला हवा. पाकवर विजय मिळणे शक्य होत असताना खेळाडूंचा दृष्टिकोनदेखील सोपा होताना जाणवला. याची झलक झेल सुटताना दिसून आली. लंकेने द.आक्रिकेविरुद्ध सुरुवात झकास केली, पण नंतर फलंदाज अचानक बॅकफूटवर आले. त्यामुळे धावांच्या गतीलादेखील खीळ बसली. भारताविरुद्ध कर्णधार अँजेलो मॅथ्यूज परतणार असल्याने संघ भक्कम होईलही, पण मॅथ्यूजने स्वत:च्या गोलंदाजीतील ओव्हर गतीवर भर द्यावा. या चुकीमुळे काळजीवाहू कर्णधार उपुल थरंगा याला दोन सामन्यासाठी निलंबन झेलावे लागले आहे. ओव्हर गती ही भारतीय उपखंडात नेहमीचीच डोकेदुखी आहे. याच समस्येमुळे अन्य काही संघदेखील दोषी ठरले. भारतीय संघ मोठे ‘रनअप’ घेणाऱ्या चार गोलंदाजांचा वापर करीत आहे. या गोलंदाजांच्या ओव्हर गतीबद्दल सावधपणा बाळगणे आवश्यक आहे. त्याचे कारण असे की, महत्त्वाच्या कुठल्याही सामन्याआधी कर्णधार निलंबित व्हावा, हे कुणालाही आवडणारे आणि परवडणारे नाही. पाकविरुद्ध अनुभवी खेळाडूंनी आपापली जबाबदारी ओळखलीच, पण मला प्रभावित केले ते हार्दिक पांड्याने. कर्णधाराच्या सोबतीने या युवा खेळाडूने कमालच केली. अश्विनऐवजी पांड्याला झुकते माप दिल्याने काहींच्या भुवया उंचावल्या असतील, पण पांड्याने निवड सार्थ ठरविली. कोहलीने पांड्याला महेंद्रसिंग धोनीऐवजी ‘फिनिशर’ म्हणून वापरल्यास आश्चर्य वाटू नये. पाकविरुद्ध जडेजाचा अनुभवदेखील लाभदायी ठरला. लंकेच्या संघाला फलंदाजीत मुरब्बीपणा दाखवावा लागेल. गोलंदाजीतील उणिवा मात्र आफ्रिकेविरुद्ध चव्हाट्यावर आल्या. याशिवाय संघाला क्षेत्ररक्षणातही मेहनत घ्यावी लागेल. भारताविरुद्ध उल्लेखनीय सुधारणा करणे गरजेचे आहे. लंका संघात मोठ्या प्रमाणावर डावखुरे फलंदाज आहेत. यामुळे भारत अश्विनला संधी देईल, असे दिसते. भारतीय संघ मोठ्या संधीच्या शोधात असल्याने कुणाशीही ‘दोन हात’ करण्याची संघाची तयारी आहे.(पीएमजी)