शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

विजयासाठी ३३० धावांची गरज - धोनी

By admin | Updated: January 15, 2016 19:50 IST

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलगच्या दोन पराभवानंतर धोनीने पराभवाचे खापर गोलंदाजावर फोडले आहे. ‘गोलंदाजीचा दर्जा पाहता आता किमान 330 धावा कराव्या लागतील

ऑनलाइन लोकमत
ब्रिस्बेन, दि. १५ - ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलगच्या दोन पराभवानंतर धोनीने पराभवाचे खापर गोलंदाजावर फोडले आहे. ‘गोलंदाजीचा दर्जा पाहता आता किमान ३३० धावा कराव्या लागतील‘ असे हताश वक्तव्य कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज दुसऱ्या सामन्यानंतर मध्यमांशी बोलताना केले. 
 
 सध्याच्या स्थितीत आमच्या गोलंदाजांची कामगिरी पाहता, फलंदाजांनी आणखी मेहनत घेऊन प्रतिस्पर्धी संघासमोर सुमारे ३३० धावांचे आव्हान ठेवले पाहिजे', असे मत कर्णधार महेंद्रसिग धोनीने या पराभवाचे विश्लेषण करताना मांडले. ' आम्ही आमच्या परीने सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण सर्वात शेवटी तुमचा परफॉर्मन्स महत्वाचा ठरतो. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी खरच उत्तम कामगिरी केली' असेही धोनी म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात तीनशेहून अधिक धावा केल्यानंतरही दोन्ही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर धोनीने हे मत व्यक्त केले. 
 
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचे 309 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पार करत पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे. आता पुढील सामाना जिंकून मालिकेतील आव्हान जिंवत ठेवायचं असेल तर फलंदाजाला ३३० पेक्षा अधिक धावा बनवणं गरजेचं असल्याचं मत भारतीय कर्णधार ढोणी यानी व्यक्त केले आहे. 
 
भारताकडून पहिल्या दोन्ही सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा व दोन्ही डावात अर्धसतक करणाऱ्या उपकर्णधार कोहलीच कौतूक करायला धोनी विसरला नाही. चेंडू जुना झाल्यानंतरही आम्ही यष्टींच्या दोन्ही बाजूंना ‘वाईड‘ चेंडू टाकले. फलंदाजांवर दडपण आणण्याची गरज असताना आम्ही ‘वाईड‘ चेंडू टाकले. त्या तुलनेत फिरकी गोलंदाजांनी चांगला मारा केला,‘‘ असे धोनी म्हणाला.