शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

नवी मुंबई विजेतेपदासाठी लढणार

By admin | Updated: December 28, 2015 03:23 IST

नवी मुंबई स्पोटर््स असोसिएशनने ६० धावांनी सहज विजय मिळवताना माझगाव क्रिकेट क्लबचा पराभव करून ६१व्या बाळकृष्ण स्मृती बापट ढाल उपनगरीय क्रिकेट

मुंबई : नवी मुंबई स्पोटर््स असोसिएशनने ६० धावांनी सहज विजय मिळवताना माझगाव क्रिकेट क्लबचा पराभव करून ६१व्या बाळकृष्ण स्मृती बापट ढाल उपनगरीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अन्य सामन्यात मांडवी मुस्लीम क्रिकेट क्लबने अंतिम फेरी गाठताना अचिव्हर्स स्पोटर््स क्लबचे आव्हान ३ विकेट्सने संपुष्टात आणले.कुर्ला स्पोटर््स क्लबच्या वतीने सुरू असलेल्या या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना एकतर्फी झाला. आशिष म्हात्रे (५४) आणि सचिन शिंदे (५१) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर नवी मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २२६ अशी मजल मारली. पंकज पाटीलने ४२ धावांत ३ बळी घेत नवी मुंबईला रोखण्याचे प्रयत्न केले. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या माझगाव संघाचा डाव केवळ १६६ धावांत संपुष्टात आणून नवी मुंबईने ६० धावांनी दणदणीत विजय मिळवला. आदित्य शेंमडकर (७८) आणि पंकज (नाबाद ३३) यांची झुंजार खेळीदेखील माझगावचा पराभव टाळू शकली नाही.दुसऱ्या बाजूला रंगतदार झालेल्या सामन्यात ठाण्याच्या मांडवी मुस्लीम क्रिकेट क्लब संघाने कुर्लाच्या अचिव्हर्स स्पोटर््स क्लबला ३ विकेट्सने नमवले. सिद्धेश मोरेने (३/२६) केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर मांडवी संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या अचिव्हर्स संघाला १४१ धावांत गुंडाळले. सुमेध कांबळे याने सर्वाधिक ४१ धावा काढून संघाला शतकी मजल मारून दिली. यानंतर धावांचा पाठलाग करताना मांडवी संघाचा डावही अडखळला. मात्र प्रकाश आसवानी (६२) आणि राहुल भट्ट (नाबाद २२) यांनी निर्णायक खेळी करून संघाला अंतिम फेरीत नेले. (क्रीडा प्रतिनिधी)