शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धा :  जेतेपदाची ‘हॅट्ट्रीक’ साधण्यास महाराष्ट्र संघ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 19:54 IST

गेली दोन वर्ष सांघिक जेतेपदावर कब्जा करणारा महाराष्ट्राचा संघ पाचव्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकवण्याच्या निर्धाराने सज्ज झाला आहे.

मुंबई : गेली दोन वर्ष सांघिक जेतेपदावर कब्जा करणारा महाराष्ट्राचा संघ पाचव्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकवण्याच्या निर्धाराने सज्ज झाला आहे. मुंबई, औरंगाबाद आणि जळगाव या जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग असलेल्या महाराष्ट्राच्या संघात प्रत्येक ६ मुले - मुली असे एकूण १२ खेळाडूंचा समावेश आहे. 

अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या वतीने (आयपा) आणि प्रथमच कर्नाटक राज्य पिकलबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली होत असलेली राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धा ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान बंगळुरु येथील तेरापंथ समाज, भिक्षू धाम जैन प्रार्थना सभागृह येथे पार पडेल. एकूण १७ राज्य संघांचा या स्पर्धेत सहभाग असून महाराष्ट्रासह यजमान कर्नाटक, बिहार, दिल्ली, हरियाणा, झारखंड, केरळ, मध्यप्रदेश, पाँडिचेरी, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या संघामध्ये जेतेपदासाठी चुरस रंगेल. त्याचवेळी गोवा, ओडिसा आणि जम्मू - काश्मिर या राज्य संघांचा समावेश निरिक्षक म्हणून करण्यात आला आहे.

तीन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिल एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा पाच गटांत रोमांचक लढती रंगतील. २०१४ साली मुंबईत झालेल्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने बाजी मारल्यानंतर प्रत्येक स्पर्धेत महाराष्ट्राकडे संभाव्य विजेते मानले जाते. मात्र, महाराष्ट्राला कट्टर प्रतिस्पर्धी राजस्थानकडून तगडे आव्हान मिळेल. राजस्थानने २०१५ साली जबरदस्त प्रदर्शन करताना बलाढ्य महाराष्ट्राला धक्का देत सांघिक जेतेपद हिसकावले होते. यानंतर मात्र, महाराष्ट्राने २०१६ व २०१७ अशी सलग दोन वर्ष सातत्य राखताना जेतेपदावर वर्चस्व गाजवले. आता पुन्हा एकदा हेच सातत्य कायम राखून महाराष्ट्राने सांघिक जेतेपदाची ‘हॅट्ट्रीक’ साधण्याचा निर्धार केला आहे. 

महाराष्ट्र संघ :मुले : तेजस महाजन, कुलदीप महाजन, अभिजीत मढभवी, सौमित्र कोरगावकर, अतुल एडवर्ड आणि क्रिष्णा मंत्री (राखीव).मुली : वृषाली ठाकरे, पूजा वाघ, करिष्मा कालिके, ॠतुजा कालिके, साक्षी बाविस्कर, आणि सलोनी देवडा (राखीव).  प्रशिक्षक : भूपेंद्र पोळ. सहाय्यक प्रशिक्षक : संदीप धायगुडे. राज्य सचिव : चेतन काते. संघ व्यवस्थापक : महेश परदेशी.

टॅग्स :Sportsक्रीडा