शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय फुटबॉल संघाने केले निराश

By admin | Updated: December 26, 2015 02:56 IST

राष्ट्रीय फुटबॉल संघाची निराशाजनक कामगिरी यंदाच्या वर्षीही मागील पानावरून पुढे सुरू राहिली; परंतु आयएसएलची वाढती लोकप्रियता आणि महान खेळाडू पेले

नवी दिल्ली : राष्ट्रीय फुटबॉल संघाची निराशाजनक कामगिरी यंदाच्या वर्षीही मागील पानावरून पुढे सुरू राहिली; परंतु आयएसएलची वाढती लोकप्रियता आणि महान खेळाडू पेले यांची भारत भेट ह्या या वर्षातील दोन संस्मरणीय घटना म्हणता येतील.फिफा अंडर-१७ वर्ल्डकप २०१७च्या यजमानपदाची तयारी करीत असलेल्या भारताच्या राष्ट्रीय संघाने पुन्हा एकदा सर्वांना निराश केले. २०१८च्या फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीत भारताला सहा सामन्यांत केवळ तीन गुणच मिळवता आले. स्टीफन कोन्सटेन्टाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने पाच सामने गमावले. भारताने एकमेव विजय गुआमविरुद्ध मिळविला. या छोट्या देशाविरुद्धही भारताने १-० असा निसटता विजय मिळविला. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून दुसऱ्यांदा जबाबदारी पार पाडत असणाऱ्या कोन्सटेन्टाईन यांना भारतीय वंशाच्या खेळाडूंना राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याच्या मुद्यावरून वादाला सामोरे जावे लागले होते. त्याशिवाय खेळाडूंना राष्ट्रीय शिबिरासाठी खेळाडूंना रिलीज न केल्याबद्दलही कोन्सटेन्टाईन चर्चेत आले होते.भारत आपल्या वर्ल्ड रँकींगमध्ये सुधारणा करू शकला नाही. सध्या भारतीय संघ १६६ व्या क्रमांकावर आहे. वर्षात हा संघ २०० देशांपैकी १७२ व्या स्थानावरही पोहोचला होता. यंदा दोन सकारात्मक गोष्टी घडल्या. त्यापैकी एक म्हणजे आयएसएलचे दुसरे पर्वही चांगले यशस्वी ठरले. चेन्नईयन एफसी संघाने जोरदार पुनरागमन करीत विजेतेपदाचा बहुमान पटकावला. पण अंतिम सामन्यानंतर एफसी गोवा संघ आणि चेन्नईचा स्टार खेळाडू एलानो ब्लूमर यांच्यातील झालेला वाद दुर्दैवी ठरला. ब्लूमरला झालेल्या अटकेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चुकीचा संदेश गेल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. २०१७ मध्ये होणाऱ्या अंडर-१७ वर्ल्डकपची तयारी भारतामध्ये जोरात सुरू आहे. गेल्या स्पर्धेचा यजमान देश चिलीने नोव्हेंबरमध्ये भारताला अधिकृतरित्या यजमानपद सोपविले. ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी सरत्या वर्षात भारत दौरा केला. त्यांचा हा दुसरा भारत दौरा होता. पण या दौऱ्यात त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहून ते भारावून गेले. भारतात फुटबॉलबद्दल असणारी आस्था पाहून हा देश क्रिकेटसारखाच फुटबॉलची महासत्ता बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. पेले यांचे शब्द खरे ठरावेत, अशीच भारतीयांची भावना आहे.भारताची एकेकाळी सर्वांत प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या आयलीग स्पर्धेचे भवितव्य धोक्यात आले आहे. पुणे एफसी, भारत एफसी आणि रॉयल वाहिंगदोह एफसी यांनी स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या स्पर्धेवर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत.