शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा; गोवा सरकारपुढे मात्र आव्हान, आयओएचे राज्य सरकारला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:57 IST

अडथळ्यांच्या शर्यतीनंतर अखेर गोव्यात ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा निश्चित झाली. ही स्पर्धा ४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होईल, असे पत्र भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) यांनी राष्ट्रीय क्रीडा परिषद आणि राज्य आॅलिम्पिक संघटना यांना पाठविले आहे.

- विलास ओहाळ पणजी : अडथळ्यांच्या शर्यतीनंतर अखेर गोव्यात ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा निश्चित झाली. ही स्पर्धा ४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होईल, असे पत्र भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) यांनी राष्ट्रीय क्रीडा परिषद आणि राज्य आॅलिम्पिक संघटना यांना पाठविले आहे.स्पर्धा निश्चित झाली असली तरी सध्याची काहीशी अस्वस्थ राजकीय स्थिती पाहता गोवा सरकारपुढे मोठे आव्हान आहे. दमदार नेतृत्वाशिवाय ही स्पर्धा आयोजित करणे शक्य नाही, असे मत गोवा आॅलिम्पिक संघटनेच्या एका पदाधिकाºयाने व्यक्त केले.सोमवारी (दि. २६) आयओएने संबंधित संघटनांना पत्र पाठवले. या पत्रात स्पर्धेच्या पात्रतेविषयी आणि नवीन नियमांविषयी माहिती देण्यात आली आहे. गोवाच्या यजमानपदाबाबत गेल्या चार-पाच वर्षांपासून वेगवेगळे तर्क-वितर्क केले गेले. त्याचबरोबर २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राज्य सरकारने आॅलिम्पिक असोसिएशनला राष्ट्रीय क्रीडा स्पधेर्चे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली होती. त्याचबरोबर राज्य सरकारला या क्रीडा स्पर्धेच्या धरसोडवृत्तीमुळे कोट्यवधी रुपयांचा दंडही सोसावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात आयोजित करणे हा राज्य सरकारसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता.गोव्यात पहिल्यांदाच झालेल्या ल्युसोफोनिया क्रीडा स्पधेर्साठी तयार केलेल्या पायाभूत सुविधांमुळे राज्य सरकारला अधिकतर नव्याने काही मोजक्याच सेवासुविधा निर्माण कराव्या लागणार होत्या. गोव्यात स्पर्धा होणार असल्याने यापूर्वीच राज्य सरकारचे क्रीडा संचालनालय कामाला लागले आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात विविध खेळांसाठी लागणा-या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आता क्रीडा स्पर्धांना आठ महिन्यांचा कालावधी उरला आहे. सायकलिंगसाठी वेलोड्रोम, शूटींग रेंज आणि हॉकी स्टेडियमची कामे प्रलंबित आहेत. ती वेळेत पूर्ण होतील की नाहीत? याबाबतही शंका आहे.‘आयओएने’ दिली होती तंबीस्पधेर्साठी यजमानपद मिळवणा-या गोव्याने स्पधेर्ची संथगतीने तयारी सुरू केली होती. वारंवार आग्रहानंतर गोव्याने स्पधेर्ची तारीख निश्चित केली नाही.आयओएने गोव्याला गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये सूचना केल्या होत्या की, कामाचा वेग वाढवला नाही तर ही स्पर्धा दुसरीकडे स्थलांतरित केली जाईल.स्पधेर्ची तारीख निश्चित करण्यासाठी गोव्याला वारंवार सांगण्यात येत आहे. यावर आमसभेत नाराजी व्यक्त करत गोवा आॅलिम्पिक संघटनेला तंबी दिली होती.या स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्याने सरकारला पावसाळ्यानंतर केवळ दोन महिने मिळणार आहेत. त्यामुळे मार्च ते जूनपर्यंतच्या कालावधीत आवश्यक कामे पूर्ण करावी लागणार आहेत, तर पावसाळ्यानंतरच्या साठ दिवसांत काही कामे करता येणार आहेत. या कामांसाठी राज्य सरकारने सुमारे २३० कोटींच्या निधींची तरतूद या वर्षीच्या अंदाजपत्रकात केलेली आहे.

टॅग्स :goaगोवा