राष्ट्रीय आट्यापाट्या
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST
राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत महाराष्ट्र उपविजेता
राष्ट्रीय आट्यापाट्या
राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत महाराष्ट्र उपविजेतानागपूर : नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या सिनियर राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेच्या दोन्ही गटात महाराष्ट्र उपविजेता राहिला.राज्य संघटनेचे सचिव डॉ. दीपक कविश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुरुष गटाच्या निर्णायक लढतीत महाराष्ट्र संघ पुड्डुचेरीकडून १५-३५, १८-२३ अशा फरकाने पराभूत झाला. महिला गटाच्या अंतिम सामन्यातही पुड्डुचेरी संघाने महाराष्ट्र संघाचा ३३-१७, १२-९ अशा फरकाने पराभव केला.महाराष्ट्र संघाकडून पुरुष गटात सागर गुल्हाने, अंकुश घाटे, अमित चव्हाण, आकाश नांदूरकर यांनी तसेच महिला संघाकडून खुशबू नेवारे, पूजा बाभुळकर, कल्याणी बेदरकर, शिवांजली नांदूरकर यांनी चमकदार कामगिरी केली.द्रोणाचार्य पुरस्कारविजेते नवनीतसिंग राणा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. यावेळी आट्यापाट्या फेडरेशनचे सीईओ डॉ. दीपक कविश्वर, फेडरेशनचे सचिव डॉ. अशोक पाटील, महाराष्ट्र आट्यापाट्या महामंडळाचे अध्यक्ष अरुण गडकरी, डॉ. शामकुमार चरडे, संजय पाटील यांची उपस्थिती होती.(क्रीडा प्रतिनिधी)