शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नेमबाजीत नंजप्पाला रियोचे तिकीट

By admin | Updated: August 12, 2015 04:16 IST

अजरबजानच्या गबाला येथे आयोजित आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या ५० मीटर पुरुष पिस्टल स्पर्धेत भारताच्या प्रकाश नंजप्पा

नवी दिल्ली : अजरबजानच्या गबाला येथे आयोजित आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या ५० मीटर पुरुष पिस्टल स्पर्धेत भारताच्या प्रकाश नंजप्पा याने आठवे स्थान पटकावत २०१६ सालच्या रियो आॅलिम्पिक कोट्याचे लक्ष्य साध्य केले. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी झालेल्या अर्धांगवायूच्या आजारातून सावरत त्याने ही कामगिरी केली आहे. बेंगळुरूचा ३९ वर्षीय नंजप्पा हा देशाला रियो आॅलिम्पिक कोटा मिळवून देणारा सहावा नेमबाज ठरला आहे. जागतिक क्रमवारीत नंजप्पा ५२ व्या स्थानी आहे. त्याने पात्रताफेरीत ५६७ अंक मिळवित दुसऱ्या स्थानासह अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम फेरीत फारशी चांगली कामगिरी झाली नसल्याने नंजप्पा स्पर्धेबाहेर झाला. मात्र, देशाला आॅलिम्पिक तिकीट मिळवून देण्यात तो यशस्वी ठरला. यापूर्वी रियो कोटा मिळवून दिलेला जीतू रायदेखील या स्पर्धेत सहभागी झाला होता. यात तो चौथ्या स्थानावर राहिला. आॅलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा, आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता गगन नारंग, अपूर्वी चंदेला, गुरप्रीतसिंह हे नेमबाज रियोचा कोटा मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. दक्षिण कोरियातील चांगवेन येथे २०१३ साली झालेल्या ग्रेनाडा विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. ही स्पर्धा सुरू असतानाच त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. यातून सावरत आॅक्टोबर २०१३ साली तेहरान येथे झालेल्या आशियाई एअरगन स्पर्धेत ५० मीटर पिस्टल प्रकारात रौप्यपदकाचा वेध घेतला होता. (वृत्तसंस्था)