शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकांची नावे सुचविण्याची मुभा

By admin | Updated: January 25, 2017 00:34 IST

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कारभार चालविण्यासाठी प्रशासकीय समितीत नेमणुकीसाठी नावे सुचविण्याची मुभा केंद्र सरकार आणि बीसीसीआयला दिली आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कारभार चालविण्यासाठी प्रशासकीय समितीत नेमणुकीसाठी नावे सुचविण्याची मुभा केंद्र सरकार आणि बीसीसीआयला दिली आहे. त्याचबरोबर ७० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीचा विचार केला जाऊ नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करीत क्रिकेट सुधारणांच्या मुद्यावरील सुनावणीला नव्याने कलाटणी दिली.कोर्टाआधी न्यायालयीन मित्र (अ‍ॅमिकस क्युरी) अनिल दिवाण आणि गोपाल सुब्रमणियम यांना प्रशासकीय समितीत नियुक्तीसाठी नावे सुचविण्यास सांगितले होते. आजच्या सुनावणीत केंद्र सरकार आणि बीसीसीआयने आम्हाला नावे सुचविण्याची मुभा द्यावी, अशी विनंती केल्यानंतर कोर्टाने प्रशासकांची नावे घोषित करण्याचा निर्णय ३० जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकला. न्या. दीपक मिश्रा, ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने केंद्र व बीसीसीआयला नावे सुचविण्यास सांगताना त्यांना २७ जानेवारीपर्यंत बंद लखोट्यात प्रशासकपद आणि आयसीसीच्या पुढच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची नावे सादर करण्यास सांगितले.बीसीसीआयच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना सांगितले की, प्रशासकपदी नियुक्तीसाठी बीसीसीआयलाही नावे सुचविण्याची परवानगी दिली जावी. कोर्टाने सिब्बल, तसेच अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या या मुद्यावरील युक्तिवादाची दखल घेत केंद्र आणि बीसीसीआयला प्रशासकीय समितीवर नियुक्तीसाठी नावे सुचविण्याची मुभा दिली. तथापि, मागच्या वर्षी १६ जुलै रोजीच्या मुख्य निकाल आणि त्यानंतरच्या आदेशातहत ही नावे असावीत, असेही कोर्टाने स्पष्ट केले.केंद्र, अ‍ॅमिकस क्युरी आणि बीसीसीआयच्या सुचविलेल्या नावांचा विचार केल्यानंतर प्रशासकीय समितीतील सदस्यांची संख्या निश्चित केली जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले.