शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर खेळपट्टीचा क्रो यांचा निर्णय ‘वैयक्तिक’: मनोहर

By admin | Updated: December 23, 2015 23:49 IST

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममधील खेळपट्टीबाबत आयसीसी मॅच रेफ्री जेफ क्रो यांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे मत बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी बुधवारी व्यक्त केले

नवी दिल्ली : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममधील खेळपट्टीबाबत आयसीसी मॅच रेफ्री जेफ क्रो यांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे मत बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी बुधवारी व्यक्त केले. आयसीसीचा निर्णय आमच्यासाठी शिरोधार्ह असल्याचेही मनोहर यांनी मान्य केले. मनोहर हे आयसीसी चेअरमन आहेत; पण त्यांनी आयसीसीचा निर्णय अप्रत्यक्षरीत्या अमान्य केला, हे विशेष.जामठ्याच्या खेळपट्टीवर भारतीय संघाने द.आफ्रिकेला कसोटी सामन्यात १२४ धावांनी पराभूत केले होते. हा सामना अडीच दिवसांत आटोपला. रविचंद्रन अश्विन याने त्या सामन्यात १२ गडी बाद केले होते. आयसीसी मॅच रेफ्रीने नागपूरच्या खेळपट्टीविरुद्ध आपला अहवाल आयसीसीकडे पाठविला होता. त्यावर आयसीसीने ‘खराब’ रेटिंग दिले, शिवाय व्हीसीएला ‘तंबी’ दिली होती. बीसीसीआयच्या अधिकृत फेसबुक पेजवर चाहत्यांशी लाइव्ह संवाद साधताना मनोहर म्हणाले,‘आयसीसीने खराब खेळपट्टीबाबत नियम तयार केले आहेत. त्यात चार गट असतात. उत्कृष्ट, चांगली, खराब आणि धोकादायक हे ते चार गट आहेत.’ खराब विकेटबाबत ते पुढे म्हणाले, ‘चेंडू एकदम स्पिन होत असेल किंवा एकदम स्विंग होत असेल, तर विकेट खराब मानली जाते. नागपुरात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चेंडू खूप स्पिन झाला; शिवाय चेंडू उसळीही घेत होता. माझ्या मते, हा क्रो यांचा वैयक्तिक निर्णय होता. हा निर्णय व्यक्तिसापेक्ष वेगवेगळा असू शकतो. विकेटवर चेंडू उसळी घेत होता किंवा अपेक्षेपेक्षा अधिक वळण घेत होता, हे ज्याच्या- त्याच्या मते परिस्थितीनुरूप कमी-अधिक होऊ शकते. एखाद्या फिरकीपटूला इतरांच्या तुलनेत अधिक टर्न मिळत असावा. या गोष्टी ध्यानात घ्यायला हव्या; पण आयसीसीने निर्णय दिला आहे आणि आम्ही निर्णयास बांधील आहोत.’ मातीची प्रत आणि हवामान यामुळे भारतात वेगवान आणि चेंडू उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या तयार करणे शक्य नाही; पण भारताच्या युवा संघाला सज्ज करण्यासाठी आम्ही १९ वर्षांचा संघ; तसेच भारतीय अ संघ या दोन्ही संघांचे अधिक दौरे आयोजित करणार आहोत. टायगर पतौडी हे माझे सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधार आणि गॅरी सोबर्स हे महान क्रिकेटपटू असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)>> सामने वाटून घेतले नाहीत!आगामी टी-२० विश्वचषकाचे सामने आयोजित करण्यात नागपूर आणि धर्मशाला या दोन केंद्रांना झुकते माप दिल्याचा आरोप मनोहर यांनी या वेळी फेटाळून लावला. मनोहर म्हणाले, ‘विश्वचषकाचे यजमानपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा बीसीसीआयने आयसीसीकडे आठ केंद्रांचा प्रस्ताव दिला होता. आयसीसी पाचच स्थळांवर सामने आयोजित करण्यास इच्छुक होते. सचिव अनुराग ठाकूर यांनी बार्बाडोसमधील आयसीसीच्या वार्षिक बैठकीत भारत किमान आठ स्थळांवर विश्वचषकाचे आयोजन करेल, असे ठासून सांगितले होते. कागदावर धर्मशाला आणि नागपूर या स्थळांना अधिक सामने मिळाल्याचे दिसते; पण या स्थळांवर पात्रता सामने अधिक होणार आहेत. भारताचे सामने नागपूर, धर्मशाला, बंगळुरू आणि मोहाली येथे होतील. सेमिफायनल दिल्ली आणि मुंबईत, तर फायनल कोलकाता येथे होईल. मनात असते तर नागपूर आणि धर्मशाळा येथे सेमिफायनलचे आयोजन करू शकलो असतो. नागपूरचे जामठा स्टेडियम ४५ हजार प्रेक्षक क्षमता असलेले देशातील सर्वोत्कृष्ट स्टेडियम आहे.’ >> डीआरएस मान्य नाहीमनोहर यांनी बीसीसीआयचा डीआरएसला विरोध कायम असल्याचा पुनरुच्चार केला. पायचितच्या निर्णयावर आमचा मुख्य आक्षेप असल्याचे ते म्हणाले. आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील दिवस-रात्र कसोटीच्या प्रयोगाबद्दल विचारताच मनोहर म्हणाले, ‘कसोटी क्रिकेट चाहत्यांना स्टेडियमकडे आकर्षित करते काय, हे तपासावे लागेल.’