शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

भारतापुढे नदाल-फेररचा अडथळा

By admin | Updated: September 9, 2016 00:25 IST

डेव्हिस कप स्पर्धेत २०११नंतर प्रथमच विश्वगटात स्थान मिळवण्याच्या भारताच्या मार्गात स्पेनचे दिग्गज खेळाडू राफेल नदाल व डेव्हिड फेरर यांचा मुख्य अडथळा असेल.

नवी दिल्ली : डेव्हिस कप स्पर्धेत २०११नंतर प्रथमच विश्वगटात स्थान मिळवण्याच्या भारताच्या मार्गात स्पेनचे दिग्गज खेळाडू राफेल नदाल व डेव्हिड फेरर यांचा मुख्य अडथळा असेल.भारत आणि स्पेन संघांदरम्यान आर. के. खन्ना टेनिस स्टेडियममध्ये १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत आयोजित डेव्हिस कप विश्व ग्रुप प्लेआॅफ लढतीसाठी स्पेनने बलाढ्य संघ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. स्पेनच्या राष्ट्रीय संघात नदाल व फेरर यांच्यासह फेलिसियानो लोपेज व मार्क लोपेज यांचा समावेश आहे. जागतिक क्रमवारीचा विचार करता, स्पेनचे चारही खेळाडू भारतीय खेळाडूंच्या तुलनेत वरचढ आहेत. नदालने अलीकडेच झालेल्या रिओ आॅलिम्पिकमध्ये एकेरीत उपांत्य फेरी गाठली होती. त्याने मार्क लोपेजच्या साथीने पुरुष दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. वर्षाच्या अखेरच्या ग्रॅण्डस्लॅम यूएस ओपन स्पर्धेत नदाला अंतिम १६मध्ये पराभव स्वीकारावा लागला. डेव्हिस कप लढतीचे यजमान असलेल्या दिल्ली लॉन टेनिस संघटनेने (डीएलटीए) यशस्वी आयोजनासाठी कंबर कसली आहे. डीएलटीएचे सचिव रणवीर चौहाण म्हणाले, ‘‘प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभावा यासाठी सामने सायंकाळच्या सत्रात आयोजित करण्यात येणार आहेत.’’ युवा चाहत्यांना दिग्गज टेनिसपटूंचा खेळ बघण्यासाठी संधी मिळावी, यासाठी डीएलटीएने लढतीचे तिकीट न विकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभेल, अशी आशा डीएलटीएने व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)१४ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावणारा नदाल विश्व मानांकनामध्ये पाचव्या क्रमांकाचा खेळाडू आहे, तर फेरर रँकिंगमध्ये १३व्या स्थानी आहे. फेलिसियानो लोपेज एकेरीच्या रँकिंगमध्ये १८व्या, तर दुहेरीच्या रँकिंगमध्ये २१व्या स्थानी आहे. मार्क लोपेज दुहेरीच्या मानांकनामध्ये १९व्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता, भारतीय संघात समावेश असलेला साकेत मायनेनी एकेरीच्या रँकिंगमध्ये १४३व्या, तर रामकुमार रामनाथन २०२व्या स्थानी आहे. दुहेरीमध्ये रोहन बोपन्ना १७व्या, तर लिएंडर पेस ६२व्या स्थानी आहेत. यूएस ओपनमध्ये बोपन्ना व पेस यांना आपापल्या जोडीदारांसह सुरुवातीलाच पराभव स्वीकारावा लागला. मायनेनीने पात्रता फेरीचा अडथळा पार करून प्रथमच मुख्य फेरीत स्थान मिळविले होते. तेथे त्याला निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला.