शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिखरने रोखला मुंबईचा विजयरथ

By admin | Updated: May 8, 2017 23:45 IST

गेल्या काही सामन्यांपासून सुसाट सुटलेला मुंबई इंडियन्सचा विजयरथ अखेर सनरायझर्स हैदराबादने रोखला. शिखर धवनने

ऑनलाइन लोकमत 
हैदराबाद, दि. 8 - गेल्या काही सामन्यांपासून सुसाट सुटलेला मुंबई इंडियन्सचा विजयरथ अखेर सनरायझर्स हैदराबादने रोखला.  शिखर धवनने केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सवर सात गडी राखून मात केली. या विजयामुळे 13 सामन्यांतून 15 गुणांसह हैदराबादने आयपीएलच्या क्वालिफायर फेरीसाठी आपले आव्हान कायम राखले आहे. 
 
मुंबईने दिलेल्या 139 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरच्या रुपात हैदराबादला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. मात्र नाबाद 62 धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनने मोझेस हेन्रिक्स (44), युवराज सिंग (9) आणि विजय शंकर (नाबाद 15) यांच्यासाथीने हैदराबादला 19व्या षटकात विजय मिळवून दिला. 
 
तत्पूर्वी  आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या मुंबईला आज सनरायझर्स हैदराबादने माफक धावसंख्येत रोखले. सिद्धार्थ कौल आणि भुवनेश्वर कुमार यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर कर्णधार रोहित शर्माचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना चमक दाखवता न आल्याने मुंबईला निर्धारित 7 बाद 138 धावांपर्यंतच मजल मारता आली. 
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या मुंबईची फलंदाजी गोलंदाजील अनुकूल खेळपट्टीवर कोलमडली.  45 चेंडूत 67 धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्माने एक बाजू लावून धरत  मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दुसरीकडून इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने 3, भुवनेश्वर कुमारने 2 तर मोहम्मद नबी आणि रशिद खानने प्रत्येकी एक बळी टिपला.