शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

मुंबईकरांची विजयी सलामी

By admin | Updated: February 26, 2017 04:10 IST

कर्णधार आदित्य तरे (८३) आणि सिद्धेश लाड (६४) यांनी मोक्याच्या वेळी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने रणजीविजेत्या गुजरातला ९८ धावांनी

मुंबई : कर्णधार आदित्य तरे (८३) आणि सिद्धेश लाड (६४) यांनी मोक्याच्या वेळी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने रणजीविजेत्या गुजरातला ९८ धावांनी लोळवून विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने ५० षटकांत ९ बाद २७३ धावांची मजल मारल्यानंतर गुजरातचा डाव १७५ धावांमध्ये गुंडाळून मुंबईकरांनी रणजी स्पर्धेतील वचपा काढला.चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा डाव एकवेळ ३ बाद ४६ असा घसरला होता. मात्र, तरे आणि लाड यांनी मोक्याच्या वेळी ११७ धावांची निर्णायक भागीदारी करून संघाला सावरले. तरेने ८१ चेंडंूत १३ चौकारांसह ८३ धावा काढल्या, तर लाडने ६० चेंडूंत २ चौकार व उत्तुंग ५ षटकार ठोकताना ६४ धावा काढल्या. गुजरातच्या चिराग परमारने ४२ धावांत ४ बळी घेऊन मुंबईकरांच्या फटकेबाजीला काही प्रमाणात लगाम घातला.यानंतर धावांचा पाठलाग करताना गुजरातची फलंदाजी ढेपाळली. आक्रमक सुरुवात केल्यानंतर कर्णधार पार्थिव पटेल (१८), हेत पटेल (१), मनप्रीत जुनेजा (१०), प्रियांक पांचाळ (३२), रुजुल भट (११) व चिराग परमार (२) ठराविक अंतराने बाद झाल्याने गुजरातची २२व्या षटकात ६ बाद १०२, अशी अवस्था झाली. रोहित दहियाने ५१ चेंडूंत ३१ धावा करून संघाकडून अपयशी झुंज दिली. मात्र, त्याला पुरेशी साथ मिळाली नाही. शिवम् मल्होत्राने ३, तर शार्दूल ठाकूर, प्रवीण तांबे यांनी प्रत्येकी २ बळी घेऊन गुजरातच्या फलंदाजीला खिंडार पाडले. (क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलक :मुंबई : ५० षटकांत ९ बाद २७३ धावा (आदित्य तरे ८३, सिद्धेश लाड ६४; चिराग परमार ४/४२) वि.वि. गुजरात : ४१.४ षटकांत सर्व बाद १७५ धावा (प्रियांक पांचाळ ३२, रोहित दहिया ३१; शिवम् मल्होत्रा ३/४९)