शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

मुंबईचा ‘हिट’ शो

By admin | Updated: May 2, 2017 01:35 IST

तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवताना स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या रॉयल चँलेंजर्स बँगलोरचा

मुंबई : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवताना स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या रॉयल चँलेंजर्स बँगलोरचा ५ विकेट्सने पराभव केला. या ‘रॉयल’ विजयाच्या जोरावर पुन्हा एकदा मुंबईकरांनी गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेताना १६ गुणांची कमाई केली. त्याचवेळी, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या आरसीबीला आणखी एका पराभवास सामोरे जावे लागले. नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. यासह मुंबईने प्ले आॅफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आक्रमक सुरुवात केल्यानंतर मुंबईकरांच्या अचूक माऱ्यापुढे त्यांचा डाव निर्धारीत षटकात ८ बाद १६२ धावांवर रोखला गेला. मुंबईकरांनी या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना एक चेंडू राखून ५ फलंदाजांच्या मोबदल्यात १६५ धावा केल्या.कर्णधार रोहित शर्माने शानदार कॅप्टन इनिंग खेळताना नाबाद ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने ३७ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व एका षटकाराने आपली खेळी सजवली. धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर फॉर्ममध्ये असलेला पार्थिव पटेल बाद झाल्याने मुंबईकरांना सुरुवातीलाच झटका बसला. परंतु, जोस बटलर (२१ चेंडूत ३३) आणि नितिश राणा (२८ चेंडूत २७) यांनी ६१ धावांची वेगवान भागीदारी करुन मुंबईला सावरले. हे दोघे संघाला सहज विजय मिळवून देणार असे दिसत असतानाच, मुंबईच्या फलंदाजीला गळती लागली.पवन नेगीने बटलर आणि राणा या दोघांनाही झटपट बाद करुन आरसीबीला पुनरागमन करुन दिले. रोहित शर्मा - केरॉन पोलार्ड जोडी जमली असे दिसत असतानाच युझवेंद्र चहलने पोलार्डला बाद केले. पाठोपाठ कृणाल पांड्या जखमी झाल्याने निवृत्त झाला, तर कर्ण शर्मालाही फारशी चमक दाखवता आली नाही. यावेळी, अचूक माऱ्याच्या जोरावर पुनरागमन केलेला आरसीबी संघ पराभवाची मालिका संपुष्टात आणणार असेच चित्र होते.परंतु, ‘हिटमॅन’ रोहितने आरसीबीचे स्वप्न धुळीस मिळवताना अखेरपर्यंत संयमाने फटकेबाजी करुन मुंबईचे विजयी सत्र कायम राखले. हार्दिक पांड्याने (नाबाद १४) रोहितला चांगली साथ देत मुंबईच्या विजयात योगदान दिले. आरसीबीकडून नेगीने २ बळी घेतले. तसेच, अंकित चौधरी, चहल आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी, आघाडीची फळी ठराविक अंतराने बाद झाल्यानंतर एबी डिव्हिलियर्सच्या जोरावर आरसीबीने समाधानकारक मजल मारली. डिव्हिलियर्सने २७ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ४३ धावांचा तडाखा दिला. कर्णधार कोहली (२०), मनदीप सिंग (१७), ट्राविस हेड (१२), केदार जाधव (२८) व शेन वॉटसन (३) पुन्हा अपयशी ठरले. नेगीने (३५) अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे आरसीबीला दिडशेचा पल्ला पार करता आला. मिशेल मॅक्क्लेनघनने ३, तर कृणाल पांड्याने २ बळी घेत आरसीबीच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. (क्रीडा प्रतिनिधी)धावफलक :रॉयल चँलेंजर्स बँगलोर : कोहली झे. रोहित गो. मॅक्क्लेनघन २०, मनदीप झे. हार्दिक गो कर्ण १७, हेड झे. हार्दिक गो. कृणाल १२, एबी झे. बुमराह गो. कृणाल ४३, केदार झे. पोलार्ड गो. मॅक्क्लेनघन २८, वॉटसन त्रि. गो. बुमराह ३, नेगी झे. पोलार्ड गो. मॅक्क्लेनघन ३५, मिल्ने नाबाद ०, अरविंद धावबाद (पटेल) ०. अवांतर - ४. एकूण २० षटकात ८ बाद १६२ धावा. गोलंदाजी : मॅक्क्लेनघन ३/३४, मलिंगा ०/३१, हार्दिक ०/५, कर्ण १/२३, बुमराह १/३३, कृणाल २/३४.मुंबई इंडियन्स : पटेल झे. चहल गो. चौधरी ०, बटलर झे. हेड गो. नेगी ३३, राणा झे. हेड गो. नेगी २७, रोहित ५६*, पोलार्ड झे. हेड गो. चहल १७, कृणाल निवृत्त २, कर्ण झे. मिल्ने गो. वॉटसन ९, हार्दिक १४*. अवांतर - ७. एकूण : १९.५ षटकात ५ बाद १६५ धावा. गोलंदाजी : पवन नेगी २/१७, वॉटसन १/२८, चौधरी १/३२, चहल १/३६.