शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या मैदानावर मुंबईचा डंका वाजणार?

By admin | Updated: April 11, 2015 23:37 IST

यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीच्याच सामन्यात पराभव पत्करावा लागलेले दोन संघ, मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आमने-सामने येतील.

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीच्याच सामन्यात पराभव पत्करावा लागलेले दोन संघ, मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आमने-सामने येतील. त्यामुळे पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या या दोन संघांतील सामना नक्कीच अटीतटीचा रंगेल. त्यात घरच्या मैदानावर यजमान मुंबई इंडियन्स कायमच वरचढ ठरल्याने अर्थातच या सामन्यात यजमान संभाव्य विजेते असतील. दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी संघात एकाहून एक धडाकेबाज खेळाडूंचा समावेश असल्याने मुंबईला गाफिल राहणे चांगलेच महागात पडू शकेल.या सामन्यापूर्वी सराव आणि विश्रांतीसाठी चांगला वेळ मिळाल्याने मुंबईकरांवर थकवा नसेल. मुंबईच्या दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास साहजिकच यजमानांची मदारही मजबूत फलंदाजीवर असेल. सलामीच्या सामन्यात संघ अडचणीत असताना कर्णधार रोहित शर्माने नाबाद ९८ धावा कुटताना मुंबईला आव्हानात्मक मजल मारून दिली होती. त्यामुळे या सामन्यातदेखील कर्णधारावर मोठी जबाबदारी असेल. शिवाय या वेळी धडाकेबाज कोरी अँडरसननेदेखील शर्माची चांगली साथ दिली होती. या दोघांशिवाय अ‍ॅरॉन फिंच, आदित्य तरे आणि अंबाती रायुडू या इतर मुख्य फलंदाजांकडूनसुद्धा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. गोलंदाजीमध्ये लसिथ मलिंगा यजमानाचे मुख्य अस्त्र आहे. सलामीच्या सामन्यात अपयशी ठरलेला मलिंगा एकदा का फॉर्ममध्ये आला तर, भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवू शकतो. त्यामुळे यजमानांना प्रतीक्षा आहे ती मलिंगाच्या फॉर्मची. याशिवाय यंदाच्या रणजी स्पर्धेतील यशस्वी गोलंदाज विनयकुमार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग, प्रग्यान ओझा यांच्यावरसुद्धा संघाची मदार असेल. हुकमी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डचा जलवा या वेळी दिसणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दुसऱ्या बाजूला पाहुण्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या गोलंदाजीची धुरा मिचेल जॉन्सनवर असेल. फलंदाजीमध्ये वीरेंद्र सेहवाग, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, कर्णधार जॉर्ज बेली आणि मुरली विजय यांच्यावर संघ अवलंबून असेल. (क्रीडा प्रतिनिधी)रोहित शर्मा (कर्णधार), अ‍ॅरॉन फिंच, अंबाती रायुडू, अभिमन्यू मिथून, आदित्य तरे, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड, कोरी अँडरसन, लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, मर्चेट डी लांगे, पवन सुयाल, श्रेयश गोपाल, लेंडल सिमेन्स, प्रग्यान ओझा, मिचेल मॅकक्लीनागन, एडेन ब्लिजार्ड, अक्षय वखरे, नितीश राणा, सिद्धेश लाड, हार्दिक पांड्या, जगदीश सुचित, उन्मुक्त चंद आणि आर. विनयकुमार.जॉर्ज बेली (कर्णधार), अक्षर पटेल, अनुरित सिंग, बुरान हेंडरिक्स, डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल, गुरकीरतसिंग मान, करणवीर सिंग, मनन वोरा, मिचेल जॉन्सन, परविंदर आवाना, ऋषी धवन, संदीप शर्मा, शार्दुल ठाकुर, शिवम शर्मा, शॉन मार्श, थिसारा परेरा, वीरेंद्र सेहवाग, वृद्धिमान साहा, मुरली विजय, निखिल नाईक आणि योगेश गोवलकर. २०१२ मध्ये पंजाबने यजमानांना घरच्या मैदानावर धक्का दिला होता. मात्र यानंतरच्या सलग दोन वर्षी मुंबईकरांनी पंजाबला लोळवले होते. सलामीच्या सामन्यात संघ अडचणीत असताना कर्णधार रोहित शर्माने नाबाद ९८ धावा कुटताना मुंबईला आव्हानात्मक मजल मारून दिली होती.मूळचा मुंबईकर असलेला शार्दुल वानखेडेची खेळपट्टी चांगली ओळखून असल्याने पंजाबला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल. त्याचबरोबर या खेळपट्टीवर कसा मारा करावा, याबाबतच्या काही टीप्सदेखील संघासाठी मोलाच्या ठरतील. त्यामुळेच आजच्या सामन्यात शार्दुल खेळणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पहिल्या सामन्यात विश्रांती दिलेल्या शार्दुल ठाकूरला या सामन्यात खेळवण्याचा निर्णय पंजाब घेऊ शकतो.