शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

घरच्या मैदानावर मुंबईकर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 01:10 IST

स्टीव्हन डीएसच्या धमाकेदार सुरुवातीनंतर शेवटच्या काही मिनिटांत एम. सनच्या अफलातून हेडरच्या जोरावर मुंबई एफसी संघाने शिलाँग लाजाँग एफसी संघाचा २-१ असा पराभव आय लीग

मुंबई : स्टीव्हन डीएसच्या धमाकेदार सुरुवातीनंतर शेवटच्या काही मिनिटांत एम. सनच्या अफलातून हेडरच्या जोरावर मुंबई एफसी संघाने शिलाँग लाजाँग एफसी संघाचा २-१ असा पराभव आय लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केला. या विजयामुळे पुन्हा एकदा घरच्या मैदानावर मुंबईकरांनी आपला हिसका दाखवला. चर्चगेट येथील कुपरेज मैदानावर झालेल्या या लढतीत मुंबईने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत शिलाँग संघावर दबाव निर्माण केला. सामन्याच्या ७ व्या मिनिटाला मुंबईचा कर्णधार तैसुुके मत्सुगेने वेगवान शूट केलेला चेंडू गोलपोस्टच्या बाजूने गेला. त्यानंतर मुंबईने आणखी आक्रमक खेळ करीत शिलाँगला दबावाखाली ठेवले. ४१ व्या मिनिटाला स्टीव्हन डीएसने गोल करुन मुंबईला १-० असे आघाडीवर नेले. विश्रांतीनंतर शिलाँगने सुरुवातीला चांगली टक्कर दिली. ५५ व्या मिनिटाला मुंबईच्या अन्वर अलीला रेफरीने पिवळे कार्ड दाखवून शिलाँग संघाला पेनल्टी बहाल केली. पेनल्टीचा फायदा घेत ५६ व्या मिनिटाला फॅबिओने गोल झळकावत शिलाँगला १-१ अशी महत्त्वपूर्ण बरोबरी केली. मात्र या बरोबरीचा फायदा घेण्यात शिलाँगला यश आले नाही. यावेळी दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. प्रतिस्पर्धी बचावफळीने तोडीस तोड खेळ केल्याने दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. सामन्यात अंतिम २० मिनिटांचा खेळ शिल्लक राहिल्यानंतर ८१ व्या मिनिटाला मुंबईच्या कुणाल सावंतने मारलेला चेंडू शिलाँगच्या गोलरक्षकाने अडवला. मात्र पुन्हा एकदा डीएसने मिनकोल सनला निर्णायक पास दिला. यावर सनने अप्रतिम हेडर करून मुंबईला २-१ असे आघाडीवर नेले. हीच आघाडी मुंबईकरांनी अखेरपर्यंत कायम राखताना महत्त्वपूर्ण विजय मिळवला. मुंबई एफसी संघाचे आता १६ गुण असून गुणतक्त्यात मुंबईकर सातव्या स्थानी आहेत, तर शिलाँग लाजाँग १५ गुणांसह नवव्या स्थानी तळाला आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)