शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांनी साहेबांना झुंजवले

By admin | Updated: March 15, 2016 03:20 IST

दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंग्लंडला सराव सामन्यात मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) एकादश संघाविरुद्ध विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले.

मुंबई : दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंग्लंडला सराव सामन्यात मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) एकादश संघाविरुद्ध विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. अखेरच्या क्षणी मुंबईकरांवर दडपण राखण्यात यशस्वी ठरल्याने इंग्लंडने १४ धावांनी रोमांचक बाजी मारली.टी-२० क्रिकेटमध्ये कोणताही संघ दुबळा नसतो, याची प्रचीती या सामन्यात आली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत ८ बाद १७७ अशी समाधानकारक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकरांना २० षटकांत ६ बाद १६३ धावाच काढता आल्या. या सामन्यात जेम्स विन्स, जोस बटलर, आदिल रशीद व डेव्हिड विले मुंबईकडून खेळले. जय बिस्टा - श्रेयश अय्यर यांनी ५७ धावांची सलामी देत चांगली सुरुवात केली. अय्यर (१६) बाद झाल्यानंतर बिस्टा - विन्स जोडीने मुंबईला सावरण्याले. बिस्टाने ३७ चेंडंूत ५ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा फटकावल्या, तर विन्सने ३८ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ४५ धावांची खेळी केली. जोस बटलरने (२५) छोटेखानी आक्रमक खेळी केली. मात्र बटलर परतल्यानंतर मुंबईकर दबावाखाली खेळ उंचावण्यात अपयशी ठरले. रिसे टोपले व ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईला नमवले. त्याआधी, ज्यो रुट (३४ चेंडूंत ४८ धावा), अ‍ॅलेक्स हेल्स (२३ चेंडूंत ३७ धावा), जेसन रॉय (२१ चेंडूंत ३२) व बेन स्टोक्स (२३ चेंडूंत ३०) यांच्या जोरावर इंग्लंडने समाधानकारक मजल मारली. डेव्हिड विलेने ३५ धावांत ३ बळी घेत इंग्लंडच्या धावसंख्येला ब्रेक लावला, तर शार्दुल ठाकूर व आदिल रशीद यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.(क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलक :इंग्लंड : २० षटकांत ८ बाद १७७ धावा (ज्यो रुट ४८, अ‍ॅलेक्स हेल्स ३७, जेसन रॉय ३२, बेन स्टोक्स ३०; डेव्हिड विले ३/३५) वि. वि. एमसीए : २० षटकांत ६ बाद १६३ धावा (जय बिस्टा ५१, जेम्स विन्स ४५; रिसे टोपले २/२६, ख्रिस जॉर्डन २/३४).