विनय नायडू - मुंबई
हैदराबाद येथे पार पडलेल्या जे. के. टायर राष्ट्रीय रोटॅक्स मॅक्स कार्टिग शर्यतीच्या पहिल्या विभागाच्या अंतिम फेरीमध्ये मुंबईकर अमेय बाफनाने सीनियर मॅक्स गटामध्ये चमकदार कामगिरीसह वर्चस्व राखत दमदार विजयी पुनरागमन केले.
2क्12 सालापासून या स्पर्धेत सहभाग घेणा:या रायो रेसिंगच्या 2क् वर्षीय अमेयचे हे पहिलेच विजेतेपद ठरले. 25 लॅपच्या (फे:या) या अंतिम शर्यतीला पोल पोङिाशनद्वारे सुरुवात करणा:या अमेयला प्रामुख्याने कोल्हापूरच्या चित्तेश मंदोदी आणि कृष्णराज महाडीक या दोन्ही मोहिते रेसिंग संघाच्या ड्रायव्हर्सकडून कडवी लढत मिळाली. मात्र सुरुवातीपासून राखलेली आघाडी अखेर्पयत कायम ठेवताना अमेयने विजेतेपदावर आपले नाव कोरले. 25 लॅपची ही शर्यत यशस्वीपणो पूर्ण करणा:या अमेयने 12:46.क्62 अशी सवरेत्तम वेळ नोंदवली. त्याच्यापाठोपाठ चित्तेश व कृष्णराज यांनी अनुक्रमे 12:46.555 व 12:47.683 अशी वेळ दिली.
मेको रेसिंग संघाचा ड्रायव्हर आकाश गोवडा याने ज्युनिअर मॅक्स गटात बाजी मारताना 11:46.क्62 अशी वेळ दिली. 22 लॅपच्या या अंतिम फेरीमध्ये रायो रेसिंगच्या आरोह रवींद्र आणि डार्क डॉन रेसिंग संघाच्या कुश मैणी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
तत्पूर्वी झालेल्या 15 लॅपच्या मायक्रो मॅक्स गटाच्या अत्यंत चुरशीच्या व थरारक अंतिम शर्यतीमध्ये मेको रेसिंग संघाच्या यश आराध्यने अवघ्या काही शतांशने आपलाच संघसहकारी पॉल फ्रान्सिसला मागे टाकत अग्रस्थान मिळवले. दखल घेण्याची बाब म्हणजे यशने या वेळी 12व्या क्रमांकवरून शर्यतीला सुरुवात करून देखील वळणावर आपले उत्कृष्ट कौशल्य दाखवताना त्याने जबरदस्त आगेकूच केली. 11 वर्षीय यशने 8:39.क्क्8 अशी सवरेत्तम वेळ देत शर्यत पूर्ण केली, तर दुस:या क्रमांकावर राहिलेल्या पॉल फ्रान्सिसने 8:39.326 अशी वेळ देत दुसरे स्थान पटकावले. विशेष म्हणजे मेको रेसिंगच्याच शहान अली मोहसीनने तृतीय क्रमांक पटकावल्याने मायक्रो गटामध्ये मेको रेसिंगचेच एकहाती वर्चस्व राहिले.