शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेत मुंबई संघाचे अजिंक्यपद

By admin | Updated: August 27, 2016 20:13 IST

सामन्याच्या सहाव्या मिनिटाला अरहान ठक्करने लगावलेल्या गोलच्या जोरावर मुंबई शहर जिल्हा संघाने कोल्हापूर जिल्हा संघाचा १-० असा पराभव केला

- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - सामन्याच्या सहाव्या मिनिटाला अरहान ठक्करने लगावलेल्या गोलच्या जोरावर मुंबई शहर जिल्हा संघाने कोल्हापूर जिल्हा संघाचा १-० असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर मुंबई संघाने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले.
 
भिवंडी येथील ऑल सेंट शाळेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मुंबई संघाने आक्रमक सुरुवात केली. सामन्याच्या सहाव्या मिनिटालाच अरहान ठक्करने प्रतिस्पर्धी बचावपटूंना भेदत गोलरक्षकाला चकमा देत सुंदर गोल झळकावला. अरहानच्या गोलमुळे मुंबई संघाने १-० अशी आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व राखले. मध्यांतरानंतर कोल्हापूर संघाच्या खेळाडूंनी सामन्यात परतण्यासाठी प्रयत्न केले. मात्र मुंबईविरुद्ध गोल नोंदविण्यात त्यांना अपयश आले. परिणामी पूर्णवेळेअंती मुंबई संघाने सामन्यात १-० असा विजय मिळवत सुब्रतो चषकावर नाव कोरले. तत्पर्वी मुंबई संघाने उपांत्य फेरीत अमरावती संघाचा २-० असा धुव्वा उडवला होता.
 
शहरातील कॅथड्रिल अ‍ॅन्ड जॉन कॅनन शाळेतील १४ वर्षांखालील संघ मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करत होता. स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर कॅथड्रिल शाळेचा संघ सप्टेंबरमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.