शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मुंबईची बंगालविरुद्ध पकड घट्ट

By admin | Updated: December 30, 2014 02:17 IST

भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर यजमान पश्चिम बंगालची ६ बाद १३० अशी अवस्था करीत सामन्यावर वर्चस्व राखले आहे. मुंबईकडे अजून २८४ धावांची आघाडी आहे.

कोलकाता : फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर पहिल्या डावात ४१४ धवांची मजल मारल्यानंतर शार्दुल ठाकूरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर यजमान पश्चिम बंगालची ६ बाद १३० अशी अवस्था करीत सामन्यावर वर्चस्व राखले आहे. मुंबईकडे अजून २८४ धावांची आघाडी आहे.कोलकाता येथील इडन गार्डन येथे सुरू असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रेयश अय्यरच्या शानदार दीड शतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ४१४ धावा फटकावल्या. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या बंगालची फलंदाजी मुंबईकरांच्या आणि खासकरून शार्दुल ठाकूरच्या माऱ्यापुढे कोलमडली. शार्दुलने सुरुवातीपासूनच टिच्चून मारा करताना केवळ ३७ धावा देताना ५ फलंदाजांना माघारी पाठवत यजमानांच्या फलंदाजीला खिंडार पाडले.बंगालच्या डावातील पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शार्दुलने अरिंदम दासला बाद करताना यजमानांना पहिला धक्का दिला. पुढच्याच षटकात विल्कीन मोटाने नुकत्याच फलंदाजीला आलेल्या सुदीप चॅटर्जीला पायचित पकडत बंगालची अवस्था २ बाद १० धावा अशी केली. यानंतर रोहन बॅनर्जीने अनुभवी मनोज तिवारीसोबत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा एकदा शार्दुलने अचूक मारा करीत बॅनर्जीला माघारी धाडले. यानंतर लगेच फलंदाजीला आलेल्या श्रीवत्स गोस्वामीला शार्दुलने आल्यापावली माघारी पाठवताना बंगालला अडचणीत आणले. जम बसलेला मनोज तिवारीदेखील काहीसा दडपणाखाली आला आणि याचा अचूक फायदा उचलताना शार्दुलने जबरदस्त मारा करीत तिवारी आणि कर्णधार लक्ष्मी रतन शुक्ला यांना चकवत बंगालची अवस्था ६ बाद १०९ अशी केविलवाणी करीत मुंबईला मजबूत वर्चस्व मिळवून दिले. भरवशाच्या मनोज तिवारीने यजमानांकडून एकाकी झुंज देताना ७८ चेंडूंत १० चौकारांच्या साहाय्याने ६३ धावा काढल्या. मुंबईकडून शार्दुलने यशस्वी मारा करताना एकट्याने बंगालचा अर्धा संघ माघारी पाठवला. तसेच विल्कीन मोटाने त्याला चांगली साथ देताना एक गडी बाद करण्यात यश मिळवले. बंगाल अजूनही २८४ धावांनी पिछाडीवर असून, त्यांचे ४ फलंदाज बाकी आहेत.तत्पूर्वी दुसऱ्या दिवशी ४ बाद ३०६ धावांवरून सुरुवात करताना मुंबईचा डाव ४१४ धावांवर आटोपला. कर्णधार सूर्यकुमार यादव लवकर बाद झाल्यानंतर सिद्धेश लाड याने संयमी खेळ करताना १०० चेंडूंत १० चौकारांच्या साहाय्याने ६४ धावा फटकावून आपली निवड सार्थ केली. मात्र सिद्धेश बाद झाल्यानंतर शेवटची फळी जास्त वेळ तग धरू न शकल्याने मुंबईची धावसंख्या मर्यादित राहिली. (वृत्तसंस्था)मुंबई (पहिला डाव) तरे झे. गोस्वामी गो. प्रताप सिंग २४, हेरवाडकर झे. चॅटर्जी गो. शुक्ला २५, अय्यर झे. गोस्वामी गो. दिंडा १५३, नायर पायचित गो. प्रताप सिंग ६५; यादव झे. गोस्वामी गो. चक्रवर्ती ३६, लाड झे. गोस्वामी गो. चक्रवर्ती ६४; सर्फराझ खान पायचित गो. दिंडा १; मोटा झे. गोस्वामी गो. ४; ठाकूर त्रि. गो. २; अब्दुल्ला त्रि. गो. प्रताप सिंग, वायंगणकर नाबाद १३. अवांतर २०. एकूण सर्वबाद ४१४ धावा. प. बंगाल (पहिला डाव) : बॅनर्जी झे. अय्यर गो. शार्दुल ७; दास झे. यादव गो. शार्दुल ५; चॅटर्जी पायचित गो. मोटा १; तिवारी झे. तरे गो. शार्दुल ६३; गोस्वामी झे. हेरवाडकर गो. शार्दुल ०; ईश्वरण खेळत आहे ३१; शुक्ला त्रि. गो. शार्दुल ११; एस. बॅनर्जी खेळत आहे १०. अवांतर २. एकूण ६ बाद १३० धावा.गोलंदाजी दिंडा : ३५-८-१०७-२; चक्रवर्ती : २६.२-८-८२-२; प्रताप सिंग : २८-५-११४-३; शुक्ला : २१-५-५८-३; बॅनर्जी : ९-१-३२-०; तिवारी : २-०-६-०.गोलंदाजी शार्दुल १६-३-३७-५; मोटा १३-२-५४-१; वायंगणकर १३-२-२७-०; अब्दुल्ला २-०-३-०; हेरवाडकर १-०-६-०; यादव १-०-१-०.