शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

‘सुपर’ आव्हानासाठी मुंबई सज्ज

By admin | Updated: May 28, 2014 03:54 IST

साखळी फेरीत निराशाजनक सुरुवात आणि तेवढ्याच दमदार पद्धतीने ‘द एण्ड’ करणारा मुंबई इंडियन्स संघ बाद फेरीत ‘सुपर’ आव्हानासाठी सज्ज झालाय

विनय नायडू, मुंबई -  साखळी फेरीत निराशाजनक सुरुवात आणि तेवढ्याच दमदार पद्धतीने ‘द एण्ड’ करणारा मुंबई इंडियन्स संघ बाद फेरीत ‘सुपर’ आव्हानासाठी सज्ज झालाय. आयपीएल-७ मधील ‘क्वालिफायर’ फेरीतील दुसर्‍या सामन्यात मुंबई इंडियन्स दोन वेळा विजेत्या ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध दोन हात करणार आहे. रविवारी रात्री मुंबईने ज्या पद्धतीने विजयोत्सव केला. तो आजही अनेकांच्या मनात आहे. त्यातून त्यांची क्षमता सिद्ध झाली आहे. दुसरीकडे, याआधी, चेन्नई सुपरकिंग्जही या अनुभवातून गेली आहे. त्यांनी तीन वेळा अंतिम फेरीत आणि दोन सेमीफायनल लढतींमध्ये रोमहर्षक विजय नोंदवलेला आहे. मॅचविनर ठरलेल्या कोरी अ‍ॅँडसरनसाठीही ‘नॉक आउट’मध्ये मुंबईचा प्रवेश दिलासा देणारा ठरलाय. ‘आम्हाला पुनरागमन करणे आवश्यक होते. कारण, लीगमध्ये आम्ही क्षमतेनुसार यशस्वी ठरलो नव्हतो. आम्हाला सर्वाेत्कृष्ट कामगिरी करावी लागेल, असे त्याने सांगितले. हा सामना बेब्रॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या नव्या ठिकाणाबाबत अ‍ॅँडरसन म्हणाला, या मैदानावर किती धावसंख्या आणि लक्ष्य कसे गाठता येईल? अशी कल्पना उभय संघांसाठी कठीण आहे. बरेचसे ‘लक फॅक्टर’वरही अवलंबून असेल. असे असले तरी आम्हाला पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करावे लागतील. एकीकडे, मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास प्रबळ आहे. तर दुसरीकडे, सलग तीन पराभवानंतर चेन्नई सुपरकिंग्जने बंगळुरूविरुद्ध विजय मिळवला आहे. मास्टर फिनिशर महेंद्रसिंग धोनी आपल्या सहकार्‍यांकडून सर्वाेत्तम कामगिरीची अपेक्षा करीत आहे. गोलंदाजीत ते अव्वल आहेत. फिरकीपटू रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची आशा असेल. तसेच फलंदाज ड्वेन स्मिथ, ड्यू फ्लेसिस, सुरेश रैना तसेच जडेजा आणि स्वत: कर्णधार धोनी हेसुद्धा धोकादायक ठरू शकतात. मुंबईला त्यांचा सलामीवीर सिमॉन्स आणि माईक हसी यांच्याकडून दमदार सुरुवातीची तसेच आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा, अम्बाती रायडू, अ‍ॅँडरसन आणि केरॉन पोलार्ड यांची बॅट अधिक तळपेल, अशी आशा आहे.