शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

राष्ट्रीय पिकलबॉलसाठी मुंबई सज्ज

By admin | Updated: June 10, 2015 01:10 IST

आगामी २६ ते २८ जूनदरम्यान हरियाणा (पानीपत) येथील जी. डी. गोएंका पब्लिक स्कूल येथे रंगणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेसाठी मुंबईचा तगडा संघ निवडण्यात आला आहे.

मुंबई : आगामी २६ ते २८ जूनदरम्यान हरियाणा (पानीपत) येथील जी. डी. गोएंका पब्लिक स्कूल येथे रंगणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेसाठी मुंबईचा तगडा संघ निवडण्यात आला आहे. गेल्या दोन स्पर्धांत विजेतेपद थोडक्यात निसटल्याने यंदा कोणत्याही परिस्थितीमध्ये बाजी मारायचीच, असा निर्धार मुंबईकरांनी केला आहे.नुकताच अंधेरी येथील शहाजी राजे क्रीडा संकुलामध्ये झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून ५ पुरुष व ५ महिला असा १० खेळाडूंचा मुंबईचा बलाढ्य संघ निवडण्यात आला आहे. एकेरीच्या पुरुष व महिला गटात अनुक्रमे अनिकेत दुर्गावळी व एकता सकपाळ यांच्याकडून मुंबईला पदकांची अपेक्षा आहे. तसेच दुहेरी गटामध्ये मुंबईच्या खेळाडूंची एकूण तयारी पाहून त्यांना पराभूत करणे कोणत्याही संघासाठी सोपे नसेल, असे भाकीत मुंबई उपनगर जिल्हा पिकलबॉल असोसिएशनचा सचिव चेतन काते याने केले आहे. संघातील इतर खेळाडूदेखील कठोर मेहनत घेत असल्याने यंदा मुंबईच्या विजेतेपदाची प्रतीक्षा नक्कीच संपेल, असेही चेतनने सांगितले.आॅल इंडिया पिकलबॉल असोसिएशनच्या (आयपा) वतीने या स्पर्धेचे पहिल्यांदाच मुंबईबाहेर आयोजन होत असल्याने स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. देशभरातून अव्वल ८ संघांनी आपला सहभाग निश्चित केला असून यामध्ये मुंबईव्यतिरिक्त महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, बिहार, पाँडेचेरी व राजस्थान या संघांचा समावेश आहे. शिवाय जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांचे विशेष निर्देशक आपल्या काही खेळाडूंसोबत या वेळी पिकलबॉलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होतील. दरम्यान, स्पर्धेतील संभाव्य विजेत्यांचा विचार केल्यास मुंबई शिवाय गतविजेत्या राजस्थानला सर्वाधिक पसंती मिळत आहे. गतस्पर्धेत राजस्थानने बाजी मारताना मुंबईला गुणांच्या आधारे मागे टाकले होते. त्यामुळे मुंबई या वेळी या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक असेल. तसेच स्पर्धेतील ‘डार्क हॉर्स’ असलेले बिहार व पाँडेचेरी यांच्या कामगिरीकडे देखील विशेष लक्ष असेल. शिवाय हरियाणाच्या अव्वल खेळाडूंना घरच्या मैदानाचा फायदा होणार असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका मुंबईकरांना बसू शकतो. (क्रीडा प्रतिनिधी) मुंबई संघ(पुरुष) : एकेरी - अनिकेत दुर्गावळी, आशिष महाजन. दुहेरी - मनीष राव, सचिन मांजरेकर. मिश्र दुहेरी - अनिकेत दुर्गावळी.(महिला) : एकेरी - एकता सकपाळ, कादंबरी पाटील. दुहेरी - प्रीती गुप्ता, अंकिता बालेकर. मिश्र दुहेरी - भाग्यश्री भंडारी.