शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आयपीएलसाठी मुंबई सज्ज -रोहित शर्मा

By admin | Updated: April 6, 2015 03:03 IST

आमचा संघ पूर्णपणे समतोल असून यंदाचे आयपीएल विजेतेपद पटकावण्यासाठी आम्ही पुर्णपणे सज्ज आहोत, असे सांगून मुंबई इंडियन्सचा कर्णधार

मुंबई : आमचा संघ पूर्णपणे समतोल असून यंदाचे आयपीएल विजेतेपद पटकावण्यासाठी आम्ही पुर्णपणे सज्ज आहोत, असे सांगून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने आयपीएल आठव्या सत्रासाठी रणशिंग फुंकले आहे. त्याचवेळी विश्वचषक कायम राखण्यात आलेले अपयश निराशाजनक असले तरी आता आमच्यासमोर आयपीएलच्या रूपाने नवे आव्हान उभे असल्याचे देखील रोहितने यावेळी सांगितले.मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि संघाचे नवे प्रशिक्षक रिकी पाँटिंग उपस्थित होते. या वेळी रोहितने सांगितले की, आम्ही युवा खेळाडूंवर अधिक भर दिला आहे. प्रशिक्षक पाँटिंग स्वत: दोन वेळचे विश्वविजेते कर्णधार असल्याने त्यांना मोठ्या स्पर्धेतील यशस्वी कामगिरीचा अनुभव आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा होईल. तसेच आयपीएलच्या माध्यमातून जगभरातील अव्वल खेळाडूंसोबत किंवा त्यांच्या विरोधात खेळण्याची संधी मिळते. यामुळे नवोदितांना शिकण्यासाठी खूप मिळते, असेही रोहित म्हणाला. गेल्या चार महिन्यांपासून भारतीय खेळाडू आॅस्टे्रलियामध्ये होते आणि त्यानंतर आता थेट आयपीएल खेळणार असून याबाबत रोहित म्हणाला की, आॅस्टे्रलिया दौऱ्यापासूनच आम्हाला आयपीएल सत्राची माहिती होती. त्यामुळे सगळेच मानसिकरीत्या तयार होते. गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्याविषयी रोहितने म्हणाला की, केकेआरची गोलंदाजी उत्तम असून ते गतविजेते आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल. शिवाय विजयी सुरुवात करणे आवश्यक असल्याने दोन्ही संघांवर दडपण असेल. इडन गार्डन स्टेडियमवरच आम्ही २०१३ साली पहिल्यांदा विजेतेपद उंचावले होते.आयपीएलमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या रिकी पाँटिंगने सांगितले की, केकेआर विरुद्धच्या सामन्यासाठी आमच्याकडे दोन दिवसांचा अवधी असून, या काळामध्ये प्रत्येक खेळाडू स्वत:ला तेथील परिस्थितीशी जुळवून घेईल. गेला आठवडाभर आम्ही कसून सराव केला आहे. (क्रीडा प्रतिनिधी)